Vidhan Parishad Election 2023: नव्या वर्षात विधानपरिषदेच्या 26 जागांसाठी उडणार राजकीय धुरळा; 5 जागांवर निवडणूक कार्यक्रमही जाहीर
या सर्व धुरळ्यात अधिक चर्चेत राहणार आहे ती म्हणजे विधान परीषद निवडणूक (Vidhan Parishad Election 2023). होय नव्या वर्षात (2023) विधानसभेच्या एकूण 26 जागांसाठी निवडणुका आणि नियुक्तीची रणधुमाळी रंगणार आहे.
Maharashtra Legislative Council Election 2023: सन 2023 या नव्या वर्षात पुन्हा एकदा महाराष्ट्रात निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. या सर्व धुरळ्यात अधिक चर्चेत राहणार आहे ती म्हणजे विधान परीषद निवडणूक (Vidhan Parishad Election 2023). होय नव्या वर्षात (2023) विधानसभेच्या एकूण 26 जागांसाठी निवडणुका आणि नियुक्तीची रणधुमाळी रंगणार आहे. त्यापैकी 5 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीरसुदधा झाला आहे. जाणून घ्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad कोणत्या आणि किती जागा 2023 या वर्षात रिक्त होणार आणि त्या कधी व कशा भरल्या जाणार.
विधानपरिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम
विधानपरिषदेच्या 5 आमदारांचा कार्यकाळ 7 फेब्रुवारी 2023 रोजी संपत आहे. कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांध्ये दोन अपक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेसच्या प्रत्येकी एका सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळे या रिक्त जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. नाशिक आणि अमरावती पदवीधर, औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघांसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. (हेही वाचा, Game of Throne In 2023: लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी 2023 मध्ये रंगणार राजकीय आखाडा, कसा रंगेल निवडणुकांचा खेळ?)
विधानपरिषद कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांची नावे, मतदारसंघ आणि त्याचे पक्ष
- कोकण शिक्षक - बाळाराम पाटील (अपक्ष)
- नागपूर शिक्षक - नागो गाणार (अपक्ष)
- अमरावती पदवीधर - रणजीत पाटील (भाजप)
- नाशिक पदवीधर - सुधीर तांबे ( काँग्रेस)
- औरंगाबाद शिक्षक - विक्रम काळे (राष्ट्रवादी काँग्रेस)
विधान परिषद निवडणूक कार्यक्रम:
विधानपरिषदेसाठी 5 जानेवारी 2023 रोजी अधिसूचना जारी होईल. त्यानुसार अर्ज भरण्याची शेवटची मूदत 12 जानेवारी 2023 रोजी असेल. 13 जानेवारी 2023 रोजी अर्जांची छाननी होईल. 16 जानेवारी 2023 पर्यंत उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घेता येईल. तर 30 जानेवारी 2023 या दिवशी सकाळी 8.00 ते दुपारी 4.00 या कालावधीत मतदान करता येईल. 2 फेब्रुवारी 2023 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.
विधानपरिषदेवर स्थानिक स्वराज्य संस्थांतून निवडल्या जाणाऱ्या 9 सदस्यांचाही कार्यकाळ संपतो आहे. कार्यकाळ संपणारे हे सदस्य त्यांचे मतदारसंघ आणि राजकीय पक्ष खालील प्रमाणे
- पुणे- अनिल भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस)
- सांगली-सातारा-मोहन कदम (काँग्रेस)
- नांदेड- अमरनाथ राजूरकर- (काँग्रेस)
- यवतमाळ- दुष्यंत चतुर्वेदी - (शिवसेना)
- जळगाव- चंदुभाई पटेल (भाजप)
- भंडारा-गोंदीया- परिणय फुके (भाजप)
- ठाणे पालघर- रविंद्र फाटक (शिवसेना)
- अहमदनगर- अरुण जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस)
- सोलापूर- प्रशांत परिचारक (भाजप)
राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांचे काय?
दरम्यान, विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांसाठी महाविकासआघाडी सरकार सत्तेत असतानाच नावे सूचविण्यात आली होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे ही यादीही सरकारने दिली आहे. परंतू राज्यपालांनी अद्यापही त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. दरम्यान आता सरकारही बदलले आहे. त्यामुळे राज्यपाल नेमका निर्णय काय घेणार याबाबतही उत्सुकता आहे. दुसऱ्या बाजूला राज्यपालांनी या नावांना अद्यापही संमती दिली नाही. अशा स्थितीत राज्यपालांच्या या भूमिकेबाबत न्यायालयात आव्हान दिले गेले आहे. त्यामुळे वरील सर्वच घडामोडींबाबत नव्या वर्षात म्हणजेच 2023 मध्ये निकाल लागण्याची शक्यता आहे.