Vidarbha Heavy Rain Update: विदर्भात पावसाचा हाहाकार; 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू

तर 10380 घरांची पडझड झाली आहे.

Rain | representative pic- (photo credit -pixabay)

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधारपावसामुळे जनजीवन विस्खळीत झाले आहे. विदर्भात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पश्चिम विदर्भात अतिवृष्टीने मोठा हाहाकार माजवला आहे. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल जाहीर केला आहे. या चार दिवसात अंगावर वीज पडून, पुरात वाहून आणि भिंत कोसळून 29 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.  (हेही वाचा - Maharashtra Rain Update: राज्यात पुढील 5 दिवस 'या' भागांत मुसळधार पाऊस, विदर्भात यलो अलर्ट)

विदर्भामध्ये 3 लाख 4887.85 हेक्टरवर शेती पिकांचे देखील नुकसान झाले आहे. तर 10380 घरांची पडझड झाली आहे. तसेच पुरात अडकलेल्या 1658 कुटुंबातील 5156 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर ओढवलं आहे. हा प्राथमिक अहवाल आहे. यात शेतकरी पार खचला असून राज्यात सर्वाधिक आत्महत्या ग्रस्त पश्चिम विदर्भतील आहेत. त्यामुळे विशेष पॅकेज या पश्चिम विदर्भासाठी जाहीर करण्यात यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २६ जुलैपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडणार आहे. आज मुंबईसह ठाण्यातही मुसळधार पावसाचाअंदाज हवामान विभागाने दिला आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागातही अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली दिला आहे.