Maharashtra: भिवंडीतील वज्रेश्वरी ही पर्यटन स्थळ म्हणून घोषित, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती
शहरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कान्हेरी लेणी (Kanheri Caves) आहेत, तर भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी हे प्राचीन मंदिर आणि गरम पाण्याचे झरे यासाठी ओळखले जाते.
मुंबईतील कान्हेरी लेणी आणि शेजारील भिवंडीतील वज्रेश्वरी (Vajreshwari) शहर हे पर्यटन केंद्र म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. पर्यटन विभागाच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेदरम्यान लोढा यांनी हे वक्तव्य केले. शहरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कान्हेरी लेणी (Kanheri Caves) आहेत, तर भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी हे प्राचीन मंदिर आणि गरम पाण्याचे झरे यासाठी ओळखले जाते. हेही वाचा Thane Traffic Update: आजपासून 26 मार्चपर्यंत ठाण्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी वाहिनी जड अवजड वाहनांकरीता मध्यरात्री 5 तास बंद
दुबई महोत्सवाच्या धर्तीवर नोव्हेंबरमध्ये मुंबई महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही लोढा यांनी सांगितले . यातून एक कोटी लोक आकर्षित होण्याची अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. पर्यटनामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे ते म्हणाले.