Vaibhavwadi Nagarpanchayat Election: वैभववाडी नगरपंचायतीत भाजपच्या एकहाती सत्तेला सुरुंग; सात नगरसेवकांचा राजीनामा

त्यामुळे वैभववाडी नगरपंचायतीवर भाजपचा एकहाती झेंडा होता. मात्र, पक्षांतर्गत कलह टोकाला गेल्याने भाजपच्या एकहाती सत्तेला सुरुंग लागला. 7 नगरसेवकांनी राजीनामा दिला. त्यामुळे आता भाजपकडे फक्त 10 नगरसेवक राहिले आहेत.

BJP | (File Image)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी नगरपंचायतीत (Vaibhavwadi Nagar Panchayat ) भाजपला मोठा (BJP) धक्का बसला आहे. वैभववाडी नगरपंचायत निवडणूक 2021 (Vaibhavwadi Nagar Panchayat Election 2021) तोंडावर आली असताना भाजपच्या सात नगरसेवकांनी एकसाथ राजीनामा दिला आहे. भाजपच्या सात नगरसेवकांसह इतरही आनेक प्रमुख नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत पक्षातील पदांचा राजीनामा दिला आहे. वैभववाडी नगरपंचायतीत भाजप बहुमतात असला तरी एकहाती सत्तेला मात्र सुरुंग लागल्याची चर्चा कोकणात रंगली आहे. प्राप्त माहितीनुसार हे नगरसेवक हातावर शिवबंधन बांधत शिवसेना ( Shiv Sena) पक्षात प्रवेश करणार असल्याचे समजते.

वैभववाडी नगरपंचायतीत एकूण 17 पैकी सर्वच्या सर्व नगरसेवक हे भाजपचे होते. त्यामुळे वैभववाडी नगरपंचायतीवर भाजपचा एकहाती झेंडा होता. मात्र, पक्षांतर्गत कलह टोकाला गेल्याने भाजपच्या एकहाती सत्तेला सुरुंग लागला. 7 नगरसेवकांनी राजीनामा दिला. त्यामुळे आता भाजपकडे फक्त 10 नगरसेवक राहिले आहेत. (हेही वाचा, Nana Patole on PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठकीत भांडण, भाजपला थेट सोडचिठ्ठी; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितला किस्सा)

एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर नगरसेवकांनी राजीनामा दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या राजीनाम्याची चर्चा आहे. 7 नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे तालुकाध्यक्षांकडे सोपवले आहेत. गेली अनेक दिवस वैभववाडी नगरपंचायत नगरसेवक आणि पदाधीकारी असा भाजपमध्ये पक्षांतर्गत वाद होता. या वादातूनच नगरसेवकांनी राजीनामास्त्र बाहेर काढल्याचे बोलले जात आहे.

पाच वर्षांपूर्वी (2015) वाभवे ग्रामपंचायतीचे रुपांतर वाभवे वैभववाडी नगरपंचायतीत झाले. या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध शिवसेना-भाजप युती असा सामना झाला. यात पाच उमेदवार पहिल्यांदाच बिनविरोध निवडून आले. यात गाव पॅनलच्या तीन, काँग्रेसची एक आणि तांत्रिकदृष्ट्या भाजपची एक अशी बलाबल होती. त्यामुळे उर्वरीत 12 जागांसाठी निवडणूक झाली. त्यात काँग्रेस 6, भाजप 4 आणि शिवसेना 2 अशा जागा निवडूण आल्या. पुढे गाव पॅनलच्या दोन सदस्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यामुळे काँग्रेसची सत्ता आली. आता भाजप 6 आणि मित्रपक्ष शिवसेना 2 अशी मिळून सदस्यसंख्या 8 राहिली. पुढे नारायण राणे यांनी स्वाभिमान पक्ष काढला आणि शिवसेनेच्या दोन्ही नगरसेवकांनी राणेंच्या पक्षात प्रवेश केला. त्यामुळे राणेंच्या पक्षाची सदस्य संख्या 12 झाली. पुढे राणेंचा स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलिन झाला. त्यामुळे वैभववाडी नगरपंचायतीत सर्वच्या सर्व 17 नगरसेवक भाजपचेच राहिले.

या वेळी प्रथमच झालेल्या निवडणुकीत एकूण 17 प्रभागांसाठी मतदानर पार पडले. प्रत्येक प्रभागात साधारण 80 ते 150 असे मतदार राहिले. पहिलीच निवडणूक होती त्यामुळे सहाजिकच नागरिकांच्या मनात विकासकामांबाबत मोठ्या आपेक्षा होत्या. त्यामुळे रस्ते, पाणी, वीज, सांडपाणी, सुशोभीकरण अशा बाबी मार्गी लागतील अशा आपेक्षा नागरिक करत होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif