Pooja Khedkar Case Update: 'प्रोबेशनरी ऑफिसला अपात्र करण्याचा अधिकार यूपीएससीला नाही'; उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान पूजा खेडकरचा दावा
त्यात न्यायालयाने पूजा खेडकरला दिलासा दिला आहे. पूजा खेडकरने उमेदवारी अपात्र ठरवल्या प्रकरणी उपीएससीला असा अधीकार नसल्याचे म्हटले आहे.
Pooja Khedkar Case Update: दिल्ली उच्च न्यायालयानं वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला(Pooja Khedkar) पुन्हा दिलासा दिला आहे. पूजा खेडकरला न्यायालयानं 5 सप्टेंबरपर्यंत दिलासा दिला असून, त्यामुळे खेडकरला 5 सप्टेंबरपर्यंत अटक करता येणार नाहीये. याआधीही 12 ऑगस्ट रोजी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनाप्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली होती. तेव्हा देखील तिला दिलासा देण्यात आला होता. आज गुरुवारी पून्हा अटकपूर्व जामिनाच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हा निर्णय सुनावला. (हेही वाचा:Delhi HC on Pooja Khedkar: पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टाचा दिलासा; तात्काळ अटकेपासून रोखले )
दरम्यान युपीएससीकडून करण्यात आलेल्या आरोपांविषयी न्यायालयात आपली बाजू मांडताना पूजा खेडकरनं काही गोष्टींची नोंद केली. प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून निवड आणि नियुक्ती झाल्यानंतर युपीएससीला आपली उमेदवारी अपात्र ठरवण्याचा अधिकार नसल्याचं म्हणत आपल्या नावात कोणतीही फेरफार केली नसल्याची बाब तिनं न्यायालयापुढे मांडली. त्यावर युपीएससी आणि दिल्ली पोलिसांच्या तक्रारीवर उत्तर देण्यासाठी न्यायालयानं खेडकरला वेळ दिला आहे.
दिल्ली उच्च न्यायालयामध्ये युपीएससीनं पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करत याचिका दाखल केली होती. यामध्ये तिनं आयोगासह जनतेची फसवणूक केल्याची बाब अधोरेखित करण्यात आली होती. केंद्रीय लोकसेवा आयोग 2022 दरम्यानच्या अर्जात चुकीची माहिती दिल्याचा आरोप पूजावर करण्यात आला होता. ज्यानंतर 31 जुलै रोजी UPSC नं तिची उमेदवारी रद्द केली होती. युपीएससीनं न्यायालयात दाखल केलेल्या उत्तरानुसार खेडकरची कोठडीतच चौकशी करणं महत्त्वाचं असून, त्यातूनच फसवणूक उघडकीस येऊ शकेत. ज्यामुळं हा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात याला. पण, न्यायालयानं मात्र पूजा खेडकरच्या बाजूनं निकाल देत तिला दिलासा दिला.