Unseasonal Rain in Maharashtra: अवकाळी पावसाचा आठ जिल्ह्यांना तडाखा, 13 हजार 729 हेक्टरला फटका; राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतीला बसलेला फटका आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हा मुद्दा राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जोरदार वादळी ठरला. विरोधकांनी अवकाळीच्या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांना घेरले. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसाणीची माहती सभागृहाला दिली.

Devendra Fadnavis | (Photo Credit - ANI)

अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतीला बसलेला फटका आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हा मुद्दा राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जोरदार वादळी ठरला. विरोधकांनी अवकाळीच्या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांना घेरले. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसाणीची माहती सभागृहाला दिली. तसेच, शेतकऱ्यांना वेळवर मदत करण्याचे अश्वासनही दिले. उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 8 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. ज्यामुळे सुमारे 13,729 हेक्टर पिकावरील शेतीचे नुकसान झाले आहे. हा आकडा आणखी वाढण्याचीही शक्यात व्यक्त केली जाता आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहाला सांगितले की, अवकाळी पावसामुळे प्रामुख्याने गहू, ज्वारी, हरभरा, मका, द्राक्ष, आंबा, पपई, संत्रा या पिकांना मोठा फटका बसला आहे. या सर्व भागाची पाहणी करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यासाठी आवश्यक माहिती राज्य सरकारने मागवली असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. (हेही वाचा, Maharashtra Weather Forecast: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात येत्या 2 दिवसात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता)

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची जिल्हानिहाय माहिती

पालघर

760 हेक्टर जमीनिवरील आंबा आणि काजूचे नुकसान.

नाशिक

2,685 हेक्टरवरील जमीनिवरील गहू, भाजीपाला, आंबा पिकांना फटका

धुळे

3,144 हेक्टरवरील शेती पिकांना फटका. प्रामुख्याने मका, गहू, हरभरा, ज्वारी, केळी पिकांचे नुकसान

नंदूरबार

1,576 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान. मका, गहू हरभरा, ज्वारी, केळी, पपई ,आंबा या पिकांना फटका

जळगाव

214 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका

अहमदनगर

4,100 हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान, पिकांना फटका

बुलढाणा

775 हेक्टर क्षेत्रावरील पिकांवर संक्रात, मोठ्या प्रमाणावर नुकसान

वाशिम

475 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचं नुकसान

दरम्यन, अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाच्या मुद्द्यासोबतच विरोधक कांदा दरावरुनही आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार छगन भुजपळ यांनी सभागृहाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, महाराष्ट्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. गुजरात सरकारही त्यांना मदत करत आहे. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली असल्याचा दावा केला जात असेल, तर शेतकऱ्यांना आर्थिक मदत का दिली जात नाही? असा सवालही छगन भुजबळ यांनी मुंबईत उपस्थित केला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now