Latur Unseasonal Rain: लातूरमध्ये गारपीट, अवकाळी पाऊस; वीज कोसळून दोन ठार, 13 जनावारांचा मृत्यू
लातूर (Latur) जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी पवासाने झोडपून काढले. ज्यामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले. याच वेळी आलेल्या वादळी वाऱ्यामध्ये विज कोसळून जवळपास 13 जनावरांचा मृत्यू झाला आहे.
Maharashtra Unseasonal Rain: राज्यात उन्हाचा कडाका वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला अवकाळी पाऊस आणि गारपीट (Garpit) मोठ्या प्रमाणावर होते आहे. लातूर (Latur) जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी पवासाने झोडपून काढले. ज्यामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले. याच वेळी आलेल्या वादळी वाऱ्यामध्ये विज कोसळून जवळपास 13 जनावरांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (21 एप्रिल) दुपारी घडली. एकाच महिन्यात अवकाळी पावसाने साधारण तीन वेळा हजेरी लावली. ज्यामुळे जवळपास 200 हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रातील शेतमालाचे नुकसान झाले.
नाशिकमधील मोठा भाग अवकाळीने झोडपून काढला
शनिवारी (20 एप्रिल) झालेला अवकाळी पाऊस कोसळल्याने तेरा जनावरे तर दगावलीच पणत्यासोबतच शेतपीकांच्या नुकसानीतही मोठी भर पडली. प्राप्त माहितीनुसार चाकूर, निलंगा, औसा, रेणापूर तालुक्यातील भाग अवकाळीने झोडपून काढला. त्यातल्या त्यात दिलासादायक म्हणजे रब्बी हंगाम जवळपास संपत आल्याने पावसाच्यातडाख्यातूनतो कसाबसा वाचला. पण, भाजीपाला पिके मात्र अवाकाळीच्या तडाख्यात चांगलीच सापडली. (हेही वाचा, Maharashtra Weather Forecast: वातावरणाचे खेंदाट! अवकाळी पाऊस, वाढते तापमान आणि उन्हाचा तडाका; माहाराष्ट्रातील हवामान अंदाज, घ्या जाणून)
वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू
दरम्यान, दोन वेगवेगल्या घटनांमध्ये पावसादरम्यान शेतात काम करत अलेल्या दोघांचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला. त्यापैक एकाचे नाव संतोष ढोले (वय 21) दुसऱ्याचे नाव मंगलाताई अशोकराव पाटील (वय 65). प्राप्त माहितीनुसार, संतोष हा चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील रहिवासी आहे. विज कोसळून जखमी झालेल्या संतोषला दवाखन्यात दाखल करण्या आले मात्र, डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. त्याच्या पश्चात आई-वडील आणि बहीण असा परिवार आहे. (हेही वाचा, Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाजl)
दुसऱ्या घटनेतील मंगलाताई अशोकराव पाटील (वय 65) या अंजनसोंडा (खु.) येथील रहिवासीआहेत. घराच्या पाठीमागे असलेल्या शेतात काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांना स्वत:चा बचाव करण्याची संधीच मिळाली नाही. (हेही वाचा, Weather: या राज्यांमध्ये उष्णतेची लाट, दिल्लीत पारा 39 अंशांवर पोहोचला, पावसाचीही शक्यता)
बैलजोडी मृत्यूमुखी
आणखी एका दुर्दैवी घटनेत शेतकरी संपत रामराव इंगळे यांच्या मालकीची एक बैलजोडी मृत्यूमुखी पडली. तहसीलदार सौदागर तांदळे यांनी दिलेल्या माहितीनुसार संपत रामराव इंगळे हे चिकलठाणा येथील रहिवासी आहेत. त्यांच्या दोन्ही बैलांवर विज कोसळली. तर औसा तालुक्यातही विज कोसळून जनावरे ठार झाली.
अवकाळी पावसाचा कोणताही भरवसा नसतो. त्यामुळे ग्रामिण भागात या पावसाला घातकी पाऊस म्हणूनही ओळखले जाते. अनेकदा या पावसामध्ये वीज कोसळने, वादळी वाऱ्याने घराचे छप्पर उडणे, वृक्ष उन्मळणे यांसारख्या अनेक घटना घडतात. त्यामुळे अनेकदा अशा प्रकारच्या पावसाची चिन्हे दिसली तर नागरिकांनी सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा, उगाचच घराबाहेर पडून नये, असा सल्ला दिला जातो.