Unlock 3: पुण्यात 4 महिन्यानंंतर उद्या पुन्हा सुरु होणार मॉल्स; पुणे महापालिकेची 'ही' मार्गदर्शक तत्वे पाळणे अनिवार्य

तब्बल चार महिन्यांंनी हे मॉल्स सुरू होत असताना दुकानदारांनी व मॉल मध्ये येणार्‍या नागरिकांंनी खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करणे आवश्यक आहे.

Image For Representation (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) उद्रेक सुरू झाल्यापासुन पुण्यात (Pune) बंंद करण्यात आलेले शॉपिंग मॉल्स (Shopping Malls)  उद्या म्हणजेच 5 ऑगस्ट पासुन पुन्हा सुरु होणार आहेत. तब्बल चार महिन्यांंनी हे मॉल्स सुरू होत असताना दुकानदारांनी व मॉल मध्ये येणार्‍या नागरिकांंनी खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करणे आवश्यक आहे. यासाठी पुणे महापालिके (Pune Municipal Corporations) तर्फे काही मार्गदर्शक तत्वे सांंगण्यात आली आहेत. ज्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे कोरोनाचे निदान झालेल्या कोणत्याच अ‍ॅक्टिव्ह रुग्णाला मॉल मध्ये प्रवेश नसेल तसेच तब्येत बरी नसल्यास केवळ वैद्यकीय कारणांसाठी (औषध खरेदी, आरोग्य तपासणी) मॉल मध्ये प्रवेश दिला जाईल. याशिवाय अन्य नागरिकांनी दुकानात, Escalators वर सोशल डिस्टंंसिंगचे नियम पाळणे अनिवार्य असेल. कुठेही थुंकलेले आढळल्यास संबधित व्यक्तीकडुन दंंड आकारला जाईल असेही सांगण्यात आले आहे. Unlock 3.0 Guidelines: केंद्र सरकारने जाहीर केली अनलॉक 3 ची मार्गदर्शक तत्त्वे

मॉल मधील दुकानदारांना दिलेल्या सुचनांनुसार, कोणीही गरोदर महिला किंवा वयोवृद्धांना कामासाठी बोलवु नये शक्य असल्यास अशा कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होम चा पर्याय द्यावा असे सांगण्यात आले आहे. केवळ मॉल मध्येच नाही तर पार्किंग मध्ये सुद्धा गर्दी होऊ नये याची जबाबदारी मालकांनी घ्यायची आहे. मॉलच्या बिल्डींंग मध्ये आणि बाहेर कोरोना व्हायरस संदर्भात जनजागृती करणारे पोस्टर लावणे गरजेचे असल्याचे सुद्धा सांंगण्यात आले आहे. Mission Begin Again अंतर्गत 5 ऑगस्ट पासून मुंबई मध्ये नेमकं काय सुरु राहणार, काय बंद? घ्या जाणून

Maharashtra Unlock 3: 5 ऑगस्ट पासून नेमकं काय सुरु राहणार, काय बंद? घ्या जाणून : Watch Video

दरम्यान मॉल जरी सुरु होत असले तरी मॉल मधील सिनेमागृह बंदच राहणार आहेत. लहान मुलांसाठी असणारे प्ले झोन तसेच रेस्टॉरंटस सुद्धा बंंद असतील मात्र फूड कोर्ट्स मध्ये डिलिव्हरी पर्याय सुरु ठेवता येणार आहे. सध्या मॉल मधील दुकानदार व मालकांमध्ये जागेच्या भाड्यावरुन वाद सुरु असल्याने सुरुवातीला 50% हुन अधिक दुकाने बंदच असतील असा अंदाज आहे. लॉकडाउन काळातील पाच महिन्यांंसाठी मालकांनी 100% भाडेमाफ करावे अशी मागणी दुकानदारांकडुन करण्यात येत आहे.