Maharashtra Unlock 2.0: महाराष्ट्रात Gym आणि धार्मिक कार्यक्रम सुरु करण्याबाबत मंत्री अस्लाम शेख यांनी दिली 'ही' महत्वाची माहिती
राज्यात तीन महिन्यापासून बंद असलेल्या धार्मिक कार्यक्रमाच्या (Religious Gatherings) बाबत मात्र अद्याप काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही असेही शेख यांनी सांगितले.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे (Coronavirus In Maharashtra) आकडे जरी वाढत असले तरी दुसरीकडे सामान्य आयुष्य पुन्हा सुरु करता यावे यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्रात सध्या तरी 30 जून पर्यंत लॉक डाऊन कायम असणार आहे. मात्र पुढील आठवड्यापासून राज्यात काही व्यवसायांना पुन्हा सुरु करण्याबाबत सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. मंत्री अस्लाम शेख यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यापासून राज्यातील जिम/ व्यायामशाळा (Gym Re- Opening) पुन्हा सुरु करण्याचा विचार आहे. तत्पूर्वी जिम च्या मालकांना खबरदारीच्या उपाययोजना विषयी माहिती देण्यात येईल. तसेच राज्यात तीन महिन्यापासून बंद असलेल्या धार्मिक कार्यक्रमाच्या (Religious Gatherings) बाबत मात्र अद्याप काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही असेही शेख यांनी सांगितले. सध्यातरी कोरोनाचे संकट पूर्णपणे टळेपर्यंत कार्यक्रम स्वेच्छेने बंद ठेवण्याचा निर्णय नागरिकांकडूनही घेण्यात येत आहे.
दुसरीकडे राज्यात येत्या रविवार पासून सलून्स सुरु करण्याला स्पष्ट परवानगी देण्यात आली आहे. सुरुवातीला तरी, केवळ केस कापण्यासाठी सलून्स सुरु होतील, दाढी करण्याची परवानगी नसेल असे साळूंच्या मालकांना सांगण्यात आले आहे.
ANI ट्विट
दरम्यान, महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे एकूण 1,42,900 रुग्ण आहेत. राज्यात आता पर्यंत 6739 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 73,792 रुग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत.