IPL Auction 2025 Live

Ramdas Athawale Statement On Aryan Khan: अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना अटक करू नये तर त्यांना..., केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं सुचक वक्तव्य

मात्र जर कोणाकडे अंमली पदार्थांचा साठा आढळला तर त्यांना तुरुंगात पाठवले जाते. ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे. आमच्या मंत्रालयाने शिफारस केली आहे की जे ड्रग्स वापरतात त्यांना योग्य आरोग्य सेवेसाठी पुनर्वसन केंद्र किंवा व्यसनमुक्ती केंद्रात पाठवावे.

Ramdas Athawale | (Photo Credits: Twitter)

भारतीय चित्रपट उद्योगात सर्वाधिक अंमली पदार्थ (Drug) विकली जातात. भारतीय चित्रपटसृष्टीत स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. आर्यन खानच्या (Aryan Khan) विरोधात सबळ पुरावे आहेत. त्यामुळेच त्याला अद्याप जामीन (Bail) मिळालेला नाही. केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Union Minister Ramdas Athawale) यांनी मंगळवारी हे वक्तव्य केले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केले. चित्रपटसृष्टीत अंमली पदार्थांचा सर्रास वापर थांबवावा लागेल, असे मत आठवले यांनी व्यक्त केले. ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे. अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना व्यसनमुक्ती केंद्रात (De-addiction center) पाठवावे, असेही रामदास आठवले म्हणाले. त्यांना अटक करू नये. तुरुंगात पाठवू नका.

पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले, जे दारू पितात, सिगारेट घेतात त्यांना तुरुंगात पाठवले जात नाही. मात्र जर कोणाकडे अंमली पदार्थांचा साठा आढळला तर त्यांना तुरुंगात पाठवले जाते. ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे. आमच्या मंत्रालयाने शिफारस केली आहे की जे ड्रग्स वापरतात त्यांना योग्य आरोग्य सेवेसाठी पुनर्वसन केंद्र किंवा व्यसनमुक्ती केंद्रात पाठवावे. तरच परिस्थिती सुधारेल.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर चित्रपटसृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जच्या वापराचा मुद्दा ऐरणीवर आला होता. आर्यन खानवर झालेल्या कारवाईत कोणताही पक्षपातीपणा केलेला नाही, असे रामदास आठवले म्हणाले. त्याच्याविरुद्ध अनेक पुरावे आहेत.  त्यामुळेच त्याला दंडाधिकारी न्यायालय आणि सत्र न्यायालयातून जामीन मिळालेला नाही. ईडी, सीबीआय, एनसीबीच्या छाप्यांमध्ये कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल. हेही वाचा Dadra Nagar Haveli By-Elections: दादरा आणि नगर हवेली पोटनिवडणूक प्रकरणी खासदार संजय राऊतांनी घेतली केंद्रीय निरीक्षक पथकाची भेट

रामदास आठवले म्हणाले की, अमली पदार्थांच्या विरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो योग्य दिशेने कारवाई करत असून जोरदार कारवाई करत आहे. अनेकांना अटक करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आले आहेत. त्याची चौकशी करण्यात आली आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.  ड्रग्जचा वाढता कल खेदजनक आहे. हे शक्य तितक्या लवकर रोखणे महत्वाचे आहे.