Uddhav Thackeray On Sharad Pawar: शरद पवार यांच्या पक्षाध्यक्ष पदावरून पाय उतार होण्याच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया!

शरद पवार यांच्या हट्टानेच मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे यांच्या मोजक्याच वेळी मंत्रालयात जाण्याच्या पवारांच्या टीपण्णीवरही ते त्यांचं मत असल्याचं ठाकरे म्हणाले आहेत.

Uddhav Thackeray (PC - PTI)

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीवर त्याचा परिणाम होणार का? याबाबत चर्चा रंगत आहे. अशामध्ये आज उद्धव ठाकरे (Uddhav  Thackeray)  यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे.  अद्याप एनसीपी मध्ये पक्ष अध्यक्ष पदाचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे त्यांचा निर्णय झाल्यानंतर आपण भाष्य करू असं म्हणत सध्या सावध भूमिके मध्ये उद्धव ठाकरे दिसत आहे. पण त्यांच्या पक्षांतर्गत निर्णयाचा राज्यात मविआ वर परिणाम होईल अशी घटना होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान शरद पवार यांच्या हट्टानेच मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे यांच्या मोजक्याच वेळी मंत्रालयात जाण्याच्या पवारांच्या टीपण्णीवरही ते त्यांचं मत असल्याचं ठाकरे म्हणाले आहेत. शरद पवारांच्या आत्मचरित्रात उद्धव ठाकरेंची कोंडी करणार्‍या अनेक घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे याचा त्यांच्या  संबंधांवर परिणाम होणार का? याची चर्चा  आहे.   Sharad Pawar एनसीपी अध्यक्ष पदाच्या राजीनाम्यावर फेरविचार करण्यास 'सशर्त' तयार; कार्यकर्त्यांकडे मागितला 2-3 दिवसांचा वेळ - अजित पवार यांची घोषणा.

सीमावासियांना ठाकरेंचा सल्ला

कर्नाटकात मराठी लोकांनी एकी मोडू नये अशी भावना आज उद्धव ठाकरेंनी मांडली आहे. दरम्यान काल मोदींनी कर्नाटकात जय बजरंग बली ची घोषणा देत मतदान करण्याचा सल्ला दिला आहे. त्यावर मोदींना चिमटे काढत बोलताना हिंदूत्त्वाचा प्रचार केला म्हणून बाळासाहेबांना मतदान करण्यापासून रोखलं होतं. मग आता नियामात काही बदल झाला आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. असं असेलच तर मराठी भाषिकांनी 'जय भवानी जय शिवाजी' म्हणून मतदान करावं असं म्हटलं आहे.

बारसू मध्ये जाणार उद्धव ठाकरे 

महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, दिवसा ऊन यामुळे वज्रमूठ सभा रद्द झाल्या असल्या तरीही बारसू प्रकल्पावरून आपण रत्नागिरीत जाणार आहोत आणि स्थानिकांशी बोलणार आहोत असंही म्हटलं आहे. बारसू ची जागा आपण दिली असली तरीही स्थानिकांना विश्वासात न घेता आणि प्रकल्पाचं सादरीकरण न करता तो लोकांच्या माथी मारणं चूकीचं असल्याचंही ते म्हणाले आहेत. जर केवळ माती परिक्षण सुरू आहे मग सरकार पोलिस बळ का वापरत आहे? असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहे.