पार्थ पडले रोहीत चढले, बारामतीत नव्या पवारांचा उदय; शिवसेना मुखपत्र 'सामना'तून छोट्या पवारांवर स्तुतीसुमने

या प्रश्नाला रोहित पवार यांनी नुकतेच जोरदार उत्तर दिले होते. या उत्तराचीच दखल सामनातून घेण्यात आली आहे.

Rohit Pawar and Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे मुखपत्र अशी ओळख असलेल्या दै. सामना (Saamana) या वृत्तपत्रातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. ‘पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं?’ असा सवाल भाजप अध्यक्ष अमति शाह (Amit Shah) यांनी विचारला होता. या प्रश्नाला रोहित पवार यांनी नुकतेच जोरदार उत्तर दिले होते. या उत्तराचीच दखल सामनातून घेण्यात आली आहे. 'अमित शाह यांच्या प्रश्नाला रोहित पवारांनी दिलेल्या उत्तरामध्ये विचारलेले प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाहीत' असे सांगतानच 'बारामतीत नव्या पवारांचा उदय झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे ', असेही सामनातून म्हटले आहे.

‘पार्थ पडले रोहित चढले’

दरम्यान, याच लेखात उद्धव ठाकरे यांनी पुढे म्हटले आहे की, ‘मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मते येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी पक्ष संपेल व त्या पक्षात फक्त शरद पवार,अजित पवार आणि सुप्रिया सुळेच उरतील. पण एका ‘चौथ्या’ पवाराने भाजपच्या आरोपांना उत्तर दिले असून पवारांचे नातू रोहित पवार यांनी विचारलेले प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाहीत. ‘पंत चढले राव आले’ अशी एक व्यवहारी म्हण आहे. त्या धर्तीवर ‘पार्थ पडले रोहित चढले’ असेच म्हणायला लागेल. गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार हे कासवगतीने पुढे जात आहेत व शरद पवारांना सोबत करीत आहेत. बारामतीत नव्या पवारांचा हा उदय दिसत आहे. २०१४ प्रमाणेच २०१९ च्या निवडणुकीतही शरद पवारांवरच हल्ले सुरू आहेत,’, अशा शब्दांत रोहित पवार यांच्या उत्तराची दखल घेत शिवसेना मुखपत्रातून स्तुतीसुमनांची उधळण करण्यात आली आहे. (हेही वाचा, Economic Recession 2019: अर्थव्यवस्थेला बूच लागला आहे, भक्तांनी कितीही उलटे सुलटे सांगितले तरी, सत्याचा कोंबडा आरवलाय: शिवसेना)

'पवारांचे योगदान नाकारता येणार नाही'

दरम्यान, पवारांच्या गोटातून प्रथमच इतके तीर सुटल्याचे सांगत शरद पवार यांनी आयुष्यभर फोडाफोडीचे राजकारण केले. आत त्यांची महाराष्ट्राच्या राजकारणावरील मूठ ढिली पडल्याचे दिसत आहे. असे असले तरी महाराष्ट्राच्या जडणघडणीत पवारांचे योगदान नाकारता येणार नाही. दरम्यान, हे योगदान नरेंद्र मोदी यांनी बारामतीत येऊन मान्य केले. 'पवार हे आपल्याला गुरुस्थानी असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी हातचे न राखता अनेकदा सांगितले. त्यामुळे पवारांचे इतक्या वर्षांचे राजकारण, समाजकारणास मोदी यांनी मान्यता दिली. हे इतके झाल्यावर पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं? असा प्रश्न विचारणारे म्हणजे डबल ढोलकीचे राजकारण असल्याचा तीर रोहित पवारांनी मारला,’असे सांगत रोहित पवारांच्या वक्तव्याचा दाखलाही या लेखात देण्यात आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif