महाविकासआघाडी च्या खातेवाटपाची यादी सोशल मीडियावर व्हायरल; आदित्य ठाकरे यांना मिळणार पर्यावरण आणि पर्यटन खाती

कोणत्या आमदाराला मिळणार मंत्रिपद तर कोणत्या पक्षाकडे जाणार कोणतं खातं याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात असताना अचानक आज सायंकाळपासून सोशल मीडिया ग्रुप्सवर मात्र शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खातेवाटपाची यादी फिरताना दिसत आहे.

महाविकास आघाडी । Photo Credits: PTI

Uddhav Thackeray Cabinet Portfolio Allocation: महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटप नक्की कधी जाहीर होणार या बद्दल सर्वानाच उत्सुकता असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र आजही त्याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. कोणत्या आमदाराला मिळणार मंत्रिपद तर कोणत्या पक्षाकडे जाणार कोणतं खातं याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात असताना अचानक आज सायंकाळपासून सोशल मीडिया ग्रुप्सवर मात्र शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खातेवाटपाची यादी फिरताना दिसत आहे.

या खातेवाटपाची यादी जर ग्राह्य असेल तर आदित्य ठाकरे यांना मात्र त्यांच्या आवडीची खाती मिळाली आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यांना पर्यावरण आणि पर्यटन ही दोन खाती दिली जाणार असल्याचे या यादीत दिसून येते.

चला तर पाहूया कोणत्या पक्षातील कोणत्या आमदाराला मिळणार आहे कोणतं मंत्रिपद

राष्ट्रवादी काँग्रेस :

1) अजित पवार - वित्त व नियोजन (अर्थमंत्री)

2) जयंत पाटील - जलसंपदा

3) छगन भुजबळ - अन्न व नागरी पुरवठा

4) अनिल देशमुख - गृह

5) दिलीप वळसे पाटील - उत्पादन शुल्क व कौशल्य विकास

6) जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण

7) हसन मुश्रीफ - ग्रामविकास

8) बाळासाहेब पाटील - सहकार व पणन

9) राजेंद्र शिंगणे - अन्न व औषध प्रशासन

10) राजेश टोपे - आरोग्य

11) धनंजय मुंडे - सामाजिक न्याय

काँग्रेसची यादी:

1) बाळासाहेब थोरात - महसूल

2) अशोक चव्हाण - सार्वजनिक बांधकाम

3) नितीन राऊत - ऊर्जा

4) विजय वड्डेटीवार - ओबीसी, खार जमिनी, मदत आणि पुनर्वसन

5) के. सी. पाडवी - आदिवासी विकास

6) यशोमती ठाकूर - महिला व बालकल्याण

7) अमित देशमुख - वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक

8) सुनील केदार - दुग्ध विकास व पशुसंवर्धन

9) वर्षा गायकवाड - शालेय शिक्षण

10) अस्लम शेख - वस्त्रोद्योग, मस्तव्यवसाय, बंदरे

11) सतेज पाटील - गृह राज्यमंत्री (शहर)

12) विश्वजित कदम - कृषी आणि सहकार राज्यमंत्री

13) नवाब मलिक - कामगार

शिवसेना

1) एकनाथ शिंदे : नगरविकास आणि सार्वजनिक

2) सुभाष देसाई : उद्योग

3) आदित्य ठाकरे : पर्यावरण आणि पर्यटन

4) संजय राठोड : वने

5) दादा भुसे : कृषी

6) अनिल परब : परिवहन आणि संसदीय कार्य

7) शंकरराव गडाख : मृदू जलसंधारण

8) संदीपान भुमरे : रोजगार हमी

9) उदय सामंत : उच्च व तंत्र शिक्षण

10) गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील खातेवाटपासाठी होणाऱ्या विलंबनाचे नवाब मलिक यांनी सांगितले कारण

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खातेवाटपाची यादी आज (4 जानेवारी) संध्याकाळी 7.30 पर्यंत राज्यपालांकडे पाठवली आहे. यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे शिक्कामोर्तब झाल्यानंतर खातेवाटप जाहीर होईल असे जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे.