Uddhav Thackeray Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा; अजित पवार, संजय राऊत यांचे हटके ट्विट पहा

दुसरीकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संजय राउत यांनी सुद्धा हटके ट्विट करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

Uddhav Thackeray Birthday Special Wishes (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray) हे आज वयाच्या 60 व्या वर्षात पदार्पण करत आहेत, सध्या राज्यात सुरु असणाऱ्या कोरोना संकटात आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय उद्धव यांनी घेतला आहे. असं असलं तरी सकाळपासूनच त्यांच्या समर्थकांनी व महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सहकारी नेत्यांनी ऑनलाईन शुभेच्छांचा वर्षाव सुरु केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सुद्धा काही वेळापूर्वी आपल्या ट्विटर अकाउंट वरून खास ट्विट करत उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दुसरीकडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तर काल रात्री बाराच्या ठोक्याला उद्धव ठाकरे यांच्या सोबतचा फोटो पोस्ट करून त्यांना शुभेच्छा दिल्या. सामना चे संपादक, खासदार, संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी ये दोस्ती हम नही तोडेंगे म्हणत उद्धव ठाकरेंचे अभिष्टचिंतन केले आहे. या मंडळींनी दिलेल्या शुभेच्छांचे ट्विट आपण आता पाहणार आहोत.

Uddhav Thackeray Birthday Special: शिवनेता नेता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजकीय आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट करताना उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो असे म्हंटले आहे. तर अजित पवार यांनी उद्धवजींच्या समर्थ, कुशल नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्ध सुरु असलेला लढा आपण निश्चितंच जिंकू तसंच पुरोगामी, प्रगत विचारांच्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशातील व जगातील अव्वल राज्य बनवू, असा विश्वास व्यक्त करत ट्विट केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट

अजित पवार ट्विट

संजय राऊत ट्विट

सुप्रिया सुळे ट्विट

जितेंद्र आव्हाड ट्विट

रोहित पवार ट्विट

अनिल देशमुख ट्विट

राजकारणाचा वारसा असलेल्या घरातून आले असले तरी उद्धव ठाकरे यांचा सक्रिय राजकारणातील हा नवा कार्यकाळ आहे, तरीही ज्या उमेदीने त्यांचे काम ते पार पाडत आहेत ते निश्चितच कौतुकास्पद आहे , अशा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लेटेस्टली परिवाराकडून वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा