Nanded Shocker: विहिरीत पोहायला गेलेल्या दोन तरुणाचा बूडून मृत्यू , नांदेड येथील घटना
ही घटना लोहा तालुक्यातील बेटसांगवी या गावात घडली आहे.
Nanded Shocker: नांदेड जिल्ह्यात विहीरीत पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना लोहा तालुक्यातील बेटसांगवी या गावात घडली आहे. बेटसांगवी गावातील संतोष वानखेडे आणि राजेश वानखेडे हे दोघे जण पोहण्यासाठी विहिरीत गेले होते. पण पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघे जण बुडाले आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा- शेतकऱ्यांना दिलासा! बोगस वाण, बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री यांबद्दल व्हाट्सॲपवर नोंदवू शकता तक्रार,)
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी दुपारी दोघे जण गावातील विहिरीत पोहण्यासाठी गेले होते. त्यानंतर दोघांन्ही विहिरीच्या पाण्यात उडी मारली. परंतु पाण्याची खोली जास्त असल्याने दोघांन्हा पोहता येत नव्हत. दोघे जण बुडू लागले. त्यावेळी कोणीही मदतीला धावले नाही. त्यामुळे दोघांचा बुडून मृत्यू झाला. दोघे ही घरी परतले नाही त्यामुळे गावकऱ्यांनी शोध घेतला. त्यावेळी शेतात असलेल्या विहिरीत दोघांचा मृतदेह दिसला. गावकऱ्यांनी दोन्ही विहिरीतून बाहेर काढले. एकाच गावातील दोघांचा मृत्यू झाल्याने गावात शोक पसरला आहे.
मुंबई काल मुसळधार पाऊस पडल्याने विक्रोळी येथे जीवितहानी झाल्याचे वृत्त झाले. मुसळधार पावसाने दोघांचा जीव घेतला आहे. घराचा स्लॅप कोसळल्याने बाप लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.