मुंबई: खार येथे नववर्षाच्या पार्टीत 19 वर्षीय महिलेच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

यात संशयितांनी श्री जोगधनकर आणि दियाने जान्हवीने मारहाण केली आणि तिचे केस पकडून तिला ओढत दुस-या मजल्यावर आणले

CRIME | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

मुंबईत नववर्षाच्या पार्टीत खार (Khar) येथे एका 19 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना खार येथील भगवती हाइट्समध्ये घडली. मिळालेल्या रिपोर्टनुसार, नववर्षाची ही पार्टी या बिल्डिंगच्या टेरेसवर ठेवण्यात आली होती. जान्हवी कुकरेजा (Janhvi Kukreja) असं मृत मुलीचे नाव आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी 22 वर्षाचा श्री जोगधनकर (Shree Jogdhankar) आणि 19 वर्षाची दिया पाडणकर (Diya Padankar) यांना अटक करण्यात आली आहे. मिड डे ने दिलेल्या रिपोर्टनुसार, जान्हवी ने एका कपलला अवघडलेल्या अवस्थेत पाहिले. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जान्हवी आणि अटक करण्यात आलेले दोघे जण यांच्यात बाचाबाची झाली. यात संशयितांनी श्री जोगधनकर आणि दियाने जान्हवीने मारहाण केली आणि तिचे केस पकडून तिला ओढत दुस-या मजल्यावर आणले.हेदेखील वाचा- ठाणे येथे नवं वर्षाच्या सेलिब्रेशन दरम्यान दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या 416 जणांसह 200 सह प्रवाशांवर कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांमध्ये झालेल्या बाचाबाचीत जान्हवी टेरेसवरुन खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात त्यांना इमारतीच्या पाय-यांवर रक्ताचे डाग दिसले आहेत. शव भाभा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून पोलिस अधिक तपास करत आहेत. IPC कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले असून पोलिस अधिक चौकशी करत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif