Western Railway ची वाहतूक विस्कळीत, Tamping Machine घसरल्याने मुंबईकडे येणाऱ्या गाड्या दीड तास उशिरा
चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेमार्गावर हा प्रकार झाल्याने शनिवारी सकाळी लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्याचं वेळापत्रक बिघडलं आहे.
पश्चिम रेल्वेवरील (Western Railway) चाकरमनी मुंबईकरांसाठी आठवड्याचा आज शेवटच्या दिवसाची सुरुवात थोडी गैरसोयीची झाली आहे. पालघर आणि केळवे या स्थानकादरम्यान सुरु असलेल्या रूळ दुरुस्तीच्या कामामध्ये मार्गावर टॅम्पिंग मशीन (Tamping Machine (TTM) ) घसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेमार्गावर हा प्रकार झाल्याने शनिवारी सकाळी लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्याचं वेळापत्रक बिघडलं आहे.
सामान्य मुंबई लोकल 15-20 मिनिटं उशिराने धावत आहे तर लांब पल्ल्याच्या गाड्या सुमारे दीड तास उशिराने धावत आहेत. शुक्रवारी रात्रीच्या पालघर -केळवे दरम्यान टॅम्पिंग मशीन घसरले. त्यानंतर सुमारे 3-4 वाहतूक ठप्प करण्यात आली आहे. मात्र शनिवारी सकाळी देखील या अपघाताचा फटका इतर रेल्वे वाहतुकीच्या गाडयांना झाला आहे. 2 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काहींच्या वेळेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
सकाळच्या वेळेस मुंबईमध्ये ऐन कामाच्या वेळेस हा गोंधळ झाल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय झाली आहे.