Mumbai Coastal Road Accident: मुंबई कोस्टल रोडवरील बोगद्यात दोन कारची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत (Watch Video)
मुंबईतील नरिमन पॉइंटकडे जाणाऱ्या कोस्टल रोड बोगद्यात हा अपघात झाला. या अपघातामुळे तात्पुरती वाहतूक कोंडी झाली. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
Mumbai Coastal Road Accident: मुंबईत गुरुवारी सकाळी कोस्टल रोडवरील (Mumbai Coastal Road) बोगद्यात दोन कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातामुळे (Accident) मुंबई कोस्टल रोडवरील वाहतूक विस्कळीत (Coastal Road Traffic Disrupted) झाली. मुंबईतील नरिमन पॉइंटकडे (Nariman Point) जाणाऱ्या कोस्टल रोड बोगद्यात हा अपघात झाला. या अपघातामुळे तात्पुरती वाहतूक कोंडी झाली. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून अपघातामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चौकशी सुरू केली असून जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर कोस्टल रोड बोगदा तात्पुरता बंद -
प्राप्त माहितीनुसार, नरिमन पॉइंट ते वांद्रे यांना जोडणारा कोस्टल रोड बोगदा अपघातानंतर तात्पुरता बंद करण्यात आला. या धडकेमुळे वाहतूक कोंडी झाली असून नरिमन पॉईंटवरून जाणारा मार्ग वळवण्यात आला आहे. या अपघातात दोन्ही वाहनांच्या समोरच्या बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अपघातग्रस्त कारमधील चालक गंभीर जखमी झाला आहे. (हेही वाचा - Neelkamal Boat Accident: गेटवे ऑफ इंडिया जवळ झालेल्या बोट अपघातात 2 जण अद्याप बेपत्ता)
वाहतूक पूर्ववत करण्यासाठी काम सुरू -
अधिकारी खराब झालेले वाहने हटवून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी काम करत आहेत. पोलीस अपघाताचा तपास करत आहेत. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. तथापि, व्हायरल फोटो आणि व्हिडिओंनुसार, दोन्ही गाड्या समोरासमोर दिसत आहेत. यावरून वाहनांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याचं समजत आहे.