आदित्य ठाकरे यांचा 'केम छो वरली!' ठरला टीकेचा विषय; नेटकऱ्यांनी असा घेतला समाचार

Aditya Thackeray (Photo: Twitter)

ठाकरे घराण्यातील निवडणुकीत उतरणारं पाहिलंच नाव म्हणजे आदित्य ठाकरे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली. मुंबईच्या वरळी विभागातून ते निवडणूक लढवणार असल्याने तेथील गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेने भलतेच पोस्टर प्रदर्शन केले.

गुजराती भाषेत 'केम छो वरली!' असा प्रश्न विचारणारे आदित्य ठाकरे यांचे पोस्टर वरळी नाका या परिसरात झळकले आहे. हा पोस्टर सोशल मीडियावर मात्र भलताच चर्चेचा विषय ठरला आहे.

नेटकरी मंडळींनी या पोस्टरला ट्विट करून अनेक टीका केलेल्या दिसून येत आहेत.

असे पोस्टर लावून आपण १०० गुजराती मते मिळवली पण लाखो मराठी मने दुखावली... मराठी आपल्याला माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया एका नेटकाऱ्याने दिली आहे तर एका नेटकाऱ्याने मराठी बाणा विकला गेला असं लिहीत निराशा व्यक्त केली आहे.

पहा काही ट्विट्स

गुजरातीसोबतच कन्नड व उर्दू भाषेतील पोस्टर्स देखील वरळी परिसरात झळकताना दिसले. आता काहीच दिवसांवर निवडणुका असल्याने या पोस्टरबाजीमुळे शिवसेना पक्षासाठी एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.