IPL Auction 2025 Live

पुणे: तुळशीबाग आणि महात्मा फुले मंडई 5 जूनपासून सुरु

यात काही सम विषमचे नियम लागू करुन सम तारखेला एका बाजूची आणि विषम तारखेला दुसऱ्या बाजूची दुकाने उघडली जाणार आहेत.

Tulsi Baug Market Representative image (Photo Credits: Flickr)

लॉकडाऊनमुळे (Lockdown) महाराष्ट्रातील अनेक भाजी मार्केट बंद आहेत. तसेच महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईत आहेत. त्यापाठोपाठ पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. यामुळे पुण्यातील तुळशीबाग (Tulsi Baug Market) आणि महात्मा फुले मंडई (Mahatma Phule Market) बंद ठेवण्यात आली होती. मात्र येत्या 5 जूनपासून या दोन्ही मंडई पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत. यात काही सम विषमचे नियम लागू करुन सम तारखेला एका बाजूची आणि विषम तारखेला दुसऱ्या बाजूची दुकाने उघडली जाणार आहेत. सोशल डिस्टंसिंग आणि सरकारने लागू केलेल्या नियमांचे पालन करत ही मंडई सुरु केली जाणार आहे.पुणे: तुळशीबाग आणि महात्मा फुले मंडई 5 जूनपासून सुरु

टीव्ही 9 मराठी ने दिलेल्या माहितीनुसार, तुळशीबाग मंडईत 318 दुकानं आणि 376 पथारी व्यवसायिक आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने तुळशीबागेची पाहणी केली. पुण्यात आतापर्यंत कोरोनाचे 8045 रुग्ण आढळले असून 338 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तर 3793 रुग्णांवर सध्या उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

हेदेखील वाचा- Coronavirus Update: मुंबईतील कोरोनाबाधितांनी 40 हजारांचा टप्पा ओलांडला; दिवसभरात 1 हजार 413 नव्या रुग्णांची नोंद; तर, 40 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या यादीत काल पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. ताज्या अपडेटनुसार, काल 1 जून रोजी राज्यात नवे 2361 कोरोना रुग्ण आढळून आले तसेच 76 मृत्यूंची नोंद झाली आहे. यानुसार सद्य घडीला राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 70,013 वर पोहचली आहे. यापैकी 2362जणांचा आजवर कोरोनाने बळी घेतला आहे तर 30 हजार 108 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाचा हॉटस्पॉट असणाऱ्या मुंबईत सुद्धा काल कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येने 40 हजाराचा आकडा पार केला. मुंबईत (Mumbai) काल 1 हजार 413 नव्या रुग्णांची नोंद झाली तर, 40 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 40 हजार 877 वर पोहचली आहे.