Pimpri- Chinchwad: रस्त्याने जाणाऱ्या तरूणीचे चुंबन घेण्याचा प्रयत्न, फूड डिलिव्हरी बॉयविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणातील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षतेच्या मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असताना राज्यात महिला अत्याचार आणि विनयभंगाचे सत्र थांबायला तयार नाहीत.

Representational Image | (Photo Credits: PTI)

साकीनाका बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेले आहे. याप्रकरणातील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षतेच्या मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून राज्यात महिला अत्याचार आणि विनयभंगाचे सत्र थांबायला तयार नाहीत. यातच पुण्याच्या (Pune) पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथे रस्त्याने जाणाऱ्या तरूणीचा विनयभंग (Molestation) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित तरूणीने वाकड पोलिसांत एका अज्ञात फूड डिलिव्हरी बॉयविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलीस या विकृत आरोपीचा शोध घेत आहेत.

लोकसत्ताने दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूणी मूळची नेपाळ येथील रहिवाशी आहे. परंतु, पोट भरण्यासाठी ती आपल्या भावासोबत पिंपरी चिंडवड येथे आली असून याच परिसरात त्यांचा चायनीज पदार्थ विकण्याचा गाडा आहे. त्यांचा गाडा रात्री उशीरा बंद होतो. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री पावणे बाराच्या सुमारास आपला चायनिज गाडा बंद करून दोघे बहीण भाऊ घराच्या दिशेने जात होते. त्यावेळी तरूणीचा भाऊ पुढे चालत असल्याचे पाहून दुचाकीवरून आलेल्या फूड डिलिव्हरी बॉयने तिला मिठी मारून तिच्या गालाचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तिच्या भावाने पाहताच फूड डिलिव्हरी बॉयने तिथून पळ काढला. हे देखील वाचा- Palghar: 5 वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या 11 वर्षीय मुलाला बोईसर येथून अटक

या घटनेनंतर तरूणीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार वाकड पोलीस ठाण्यात जाऊन सांगितला. त्यानंतर तरूणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात फूड डिलिव्हरी बॉय विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत आहेत. तसेच या घटनेनंतर शहरात महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे.