Thane Accident: घोडबंदर रोडवर ट्रक पलटला, चालक गंभीर जखमी

ठाण्याच्या घोडबंदर रोडवर हा अपघात झाला आहे. केमिकलने भरलेला ट्रक पलटी झाला. त्यामुळे हा अपघात घडला.

Thane Accidnet PC X

Thane Accident: नवी मुंबईहून पंजाबकडे जाणाऱ्या एता ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. ठाण्याच्या घोडबंदर रोडवर हा अपघात झाला आहे. केमिकलने भरलेला ट्रक पलटी झाला. त्यामुळे हा अपघात घडला.  अपघातात एक जण जखमी झाला होता. घटनेमुळे परिसरात वाहतुक विस्कळीत झाली होती, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. (हेही वाचा- हैदराबादच्या वनस्थलीपुरममध्ये हिट अँड रनची घटना, अपघाताचा भीषण व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद)

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकमध्ये केमिकल होते. जे नवी मुंबई येथून पंजाबला घेऊन जात होते. त्यावेळीस अचनाक ठाण्याच्या घोडबंदर रोडवर केमिकल ट्रक उलटला. अपघातानंतर रस्ता बंद करावा लागला. अपघातामुळे रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

घोडबंदर वरील अपघात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघाच झाला आणि ट्रक पलटी झाला. यात चालक जखमी झाला. ट्रक पलटी झाल्याने वाहनात असलेले रसायन रस्त्यावर सांडले आहे.  पोलिसांनी संबंधित केमिकल कंपनीला अपघात आणि गळतीची माहिती दिली होती. ट्रक पलटी झाल्यामुळे चालक वाहनाखाली अडकला  होता. पोलिसांनी ट्रक चालकाची सुटका करत त्याला रुग्णालयात दाखल केले. दोन हायड्रा मशिनच्या साहाय्याने अपघातग्रस्त कंटेनर रस्त्याच्या कडेला नेण्यात आला आणि वाहतूक सेवा सुरळीत करण्यात आली.



संबंधित बातम्या