Attack on Traffic Police: वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातला ट्रक; सोलापूर येथील धक्कादायक घटना

ही घटना सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वरवडे गावाजवळील टोल नाक्याजवळ ही घटना घडली आहे.

Accident Representational image (PC - PTI)

आपले कर्तव्य बाजावत असताना एका वाहतूक पोलिसांच्या (Traffic Police) अगांवर ट्रक घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वरवडे गावाजवळील टोल नाक्याजवळ  घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. दरम्यान, याची गंभीर दखल घेत याप्रकरणी उच्चस्तरीय बैठक बोलवणार असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले आहेत.

सागर चोबे, असे वाहतूक पोलिसांचे नाव आहे. तर, नवनाथ बिबळेला असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. माढा तालुक्यातील वरवडे गावाजवळील टोल नाक्याजवळ आपले कर्तव्य बजावत असताना सागर चोबे यांच्या अंगावर ट्रक घातला. यात सागर चोबे यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी नवनाथला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सागर चोबे यांच्या मृत्यूनंतर वाहतूक पोलिसांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलिसांवरील हल्ल्यांसदर्भात लवकरच उच्चस्तरीय बैठक बोलावणार असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे, अशी माहिती एबीपी माझाने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- Samruddhi Mahamarg: नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्ग येत्या 1 मे पर्यंत होणार वाहतुकीसाठी खुला; मुंबई पर्यंतचे काम पुढच्या एक वर्षात पूर्ण

चालक बेदरकारपणे महामार्गावर वाहने चालवतात, यासाठी आत्ताच्या नियमांपेक्षा अधिक कडक नियम करणे आवश्यक आहे. वाहतुकीचे नियम पहिल्यांदा, दुसऱ्यांदा मोडल्यास शिक्षा होते पण वारंवार जर हे झाले तर त्याचे लायसन्स रद्द करणे गरजेचे असल्याचेही देसाई म्हणाले आहेत. विशेषतः महामार्गावरील वाहतूक पोलिसांना आणि संबंधित सर्वच यंत्रणांबाबत या बैठकीत एकत्रीत चर्चा होईल, असेही ते म्हणाले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif