Palghar Shocker: आदिवसी महिलेवर शेतकमालकाचा बलात्कार, पालघर येथील घटना

महाराष्ट्रातील पालघर (Palghar) जिल्ह्यात एका 29 वर्षीय आदिवासी महिलेवर तिच्या मालकाने वारंवार बलात्कार केल्याची घटना पुढे आली आहे. पोलिसांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, पीडितेवर अत्याचार करणारा आरोपी शेतमालक आहे.

Crime | (File image)

महाराष्ट्रातील पालघर (Palghar) जिल्ह्यात एका 29 वर्षीय आदिवासी महिलेवर तिच्या मालकाने वारंवार बलात्कार केल्याची घटना पुढे आली आहे. पोलिसांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, पीडितेवर अत्याचार करणारा आरोपी शेतमालक आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, 1989 च्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डहाणू पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली.

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, महिलेने 2021 पासून आरोपीच्या शेतात काम केले आणि त्याने तीन वर्षांच्या कालावधीत तिच्यावर वारंवार बलात्कार केला आणि तिला धमकावले. या प्रकरणातील आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तपास अद्यापही सुरु आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement