Mumbra: मुंब्य्रातील मनसे कार्यालयावर दगडफेक, तिघांना अटक

तिघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Arrest | Representational Image | Photo Credits: File Photo

शुक्रवारी पहाटे मुंब्रा (Mumbra) येथील मनसे कार्यालयावर (MNS office) दगडफेक करणाऱ्या तिघांना मुंब्रा पोलिसांनी (Mumbra Police) अटक केली आहे. तिघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मनसे नेते राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या 12 एप्रिल रोजी होणाऱ्या ठाण्यातील सभेच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला आहे. ठाकरे यांनी मशिदींविरोधात वक्तव्य केले होते आणि मदरशांमधील गैरप्रकारांमुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला होता. मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कडलग म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाचे मुंब्रा येथे शाखा कार्यालय आहे, तेथे शुक्रवारी पहाटे 12.30 च्या सुमारास तीन जणांनी दगडफेक केली. हेही वाचा Kirit Somaiya यांची मुंबई सत्र न्यायालयात धाव, INS विक्रांत गैरव्यवहारप्रकरणी अटकपूर्व जामीन याचिका दाखल

आम्ही सीसीटीव्ही फुटेज पाहिले आणि आरोपींना अटक करून कोर्टात हजर केले, जिथे त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. मनसेचे मुंब्रा येथील पदाधिकारी इरफान सय्यद यांनी ही तक्रार दाखल केली आहे. सेहजाद शेख, सेहझान अब्दुल रहमान आणि शफिक रफिक खान अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.  दरम्यान, 12 एप्रिल रोजी गडकरी रंगायतनजवळील मूस रोड येथे ठाकरे यांच्या सभेला ठाणे पोलिसांनी परवानगी दिली आहे