Threat Message to Sanjay Raut: संजय राऊत यांना धमकीप्रकरणी पुण्यातून एक जण ताब्यात; सुप्रिया सुळेंनी केली राऊतांच्या सुरक्षेत वाढीची मागणी

संजय राऊत यांच्यासाठी खासदार सुप्रिया सुळे धावून आल्या आहेत. सरकारने संजय राऊतांना तातडीने झेड प्लस सुरक्षा दिलीच पाहिजे अशी मागणी केली आहे.

Threat Message to Sanjay Raut: संजय राऊत यांना धमकीप्रकरणी पुण्यातून एक जण ताब्यात; सुप्रिया सुळेंनी केली राऊतांच्या सुरक्षेत वाढीची मागणी
Sanjay Raut | (Photo Credit: Facebook)

ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. लॉरेन्स बिष्णोई गँगच्या (Lawrence Bishnoi Gang ) नावाने संजय राऊतांना धमकी आल्याचा दावा केला जात असल्याने आता राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी 'दिल्लीत एके 47 रायफलने गोळ्या घालण्याची धमकी मेसेजमध्ये देण्यात आली आहे'. त्याबाबत आपण तक्रार नोंदवली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. “धमक्या येत असतात. पण विरोधकांना आलेल्या धमक्यांकडे सरकार गांभीर्याने पाहत नाही. सगळी सुरक्षा व्यवस्था गद्दार गटाचे आमदार, खासदार, पदाधिकारी यांच्यासाठी लावली आहे त्यामुळे महाराष्ट्रातली कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे ढेपाळली आहे”असं मत त्यांनी व्यक्त केले आहे. ANI च्या माहितीनुसार संजय राऊत यांना धमकी प्रकरणी एक जण पुण्यातून ताब्यात घेण्यात आला आहे.

लॉरेन्स बिष्णोई गँगने पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्याप्रमाणे संजय राऊत यांना ठार मारले जाईल असं म्हटलं आहे. सिद्धू मुसेवाला वर तो गाडीत असताना त्याच्या गाडीला घेरून गोळीबार करून त्याला संपवण्यात आले होते. सध्या लॉरेन्स बिष्णोई गँगच्या निशाण्यावर बॉलिवूड दबंगस्टार सलमान खान देखील आहे. पोलिसांनी सध्या सलमान खानच्या सुरक्षेत वाढ केलेली आहे. सलमान खानला ज्यांनी धमकी दिली, त्याच गँगच्या माध्यमातून धमकी आली आहे. त्यातल्या काहींना पकडलंय असंही माझ्यापर्यंत आलंय. असं झालं असेल, तर त्यासाठी मी पोलिसांचा आभारी असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. नक्की वाचा: Salman Khan Death Threat: सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी चाहत्यांना सलमानच्या वांद्रे अपार्टमेंटबाहेर जमण्यापासून रोखले .

पहा ट्वीट

संजय राऊत यांच्यासाठी खासदार सुप्रिया सुळे धावून आल्या आहेत. सरकारने संजय राऊतांना तातडीने झेड प्लस सुरक्षा दिलीच पाहिजे. संजय राऊत हे खासदार आहेत, तसेच देशातले मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांना सुरक्षा प्रदान करायला हवी. याबाबत मी स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून ही मागणी करणार असल्याचं म्हटलं आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 01, 2023 12:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).