Maharashtra Mayor Elections 2019: कोण होणार मुंबईचा नवा महापौर? 'ही' आहेत काही नावे

मुंबई महानगरपालिकेत एकूण 95 नगरसेवक असलेला शिवसेना पक्षच आपला महापौर बसवेल यात काही शंका नाही.

The BrihanMumbai Municipal Corporation (BMC) (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागली असतानाच दुसरीकडे मात्र नगरविकास मंत्रालयाने (Ministry of Urban Development) महाराष्ट्रातील 27 महापौर पदांसाठी 13 नोव्हेंबर रोजी चिठ्ठ्या टाकून आरक्षण जाहीर केले आहे.  22 नोव्हेंबर रोजी त्यासंबंधित निवडणुका (Maharashtra Mayor Elections 2019) घेण्यात येणार असून मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली, सांगली आणि उल्हासनगर या सर्व जागा खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

परंतु राजकीय वर्तुळात सध्या चर्चा दिसून येत आहे ती म्हणजे मुंबईच्या महापौरपदाची (Mumbai Mayor Election). मुंबई महानगरपालिकेत एकूण 95 नगरसेवक असलेला शिवसेना पक्षच आपला महापौर बसवेल यात काही शंका नाही. परंतु हा चेहरा कोण असेल यावर मात्र अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. त्याचसोबत उमेदवारांमध्ये पण या महत्त्वाच्या पदासाठी प्रचंड रस्सीखेच दिसून येत आहे.

आगामी महापौरपदासाठी आघाडीवर मानली जात असलेली नावं आहेत मंगेश सातमकर आणि आशिष चेंबुरकर. तसेच महिला नागरसेवकांपैकी माजी महापौर आणि विद्यमान सभागृह नेत्या विशाखा राऊत यांच्यासोबतच किशोरी पेडणेकर, शितल म्हात्रे यांच्या नावांची देखील चर्चा पाहायला मिळत आहे.

Maharashtra Mayor Elections 2019: महाराष्ट्रात 22 नोव्हेंबर रोजी पार पडणार 27 महापौर पदासाठी मतदान

दरम्यान महापौरपदाचे आरक्षण जाहीर होताना मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह इतर महापालिकांचे महापौर, उपमहापौर तसेच पदाधिकारी, नगरविकास विभागाचे सहसचिव, अप्पर सचिव, कक्ष अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी तेथे उपस्थित होते.