Mumbai Airport: मुंबई विमानतळावर चोरी, चक्क 10 लाख रुपयांचा चेक चोरला, गुन्हा दाखल

मुंबई - जयपूर एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फ्लाइटमध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एका अज्ञात प्रवासाने चक्क दुसऱ्या प्रवाशाच्या बॅगमधून १० लाख रुपयांचा चेक चोरला आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj International Airport | (Photo Credit - Twitter/ANI)

Mumbai Airport: एअर पोर्टवर चोरी होणं ही गोष्ट आता सामान्य राहिली नाही, सुरक्षा चोक असून सुध्दा मुंबई एअरपोर्टवर धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबई - जयपूर एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फ्लाइटमध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एका अज्ञात प्रवासाने चक्क दुसऱ्या प्रवाशाच्या बॅगमधून १० लाख रुपयांचा चेक चोरला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ९हेही वाचा- देशात यंदा 2.01 लाख कोटी रुपयांची जीएसटी चोरी उघड; मुंबई अव्वल, ऑनलाइन गेमिंग सेक्टरमधून सर्वाधिक प्रकरणे

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात २७ ऑगस्ट रोजी मुंबई एअरपोर्टवर ही चोरी घटना घडली. मुंबई जयपूर एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फ्लाइटमध्ये ही घटना घडली. चोरीच्या घटनेनंतर पीडितेने सहार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. १५ सप्टेंबर रोजी अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्यात आला. जितेंद्र चौधरी असं तक्रारदाराचे नाव आहे.

जितेंद्र चौधरी यांना जयपूरमध्ये उतरल्यावर समजले की, कोणीतरी त्यांच्या बॅगेची छेडछाड केली आहे. बॅग उघडून पाहिले तर बॅगेत १० लाख रुपयांचा चेक नव्हता आणि काही पैसे देखील चोरी झाले. चोरट्याने चुकीच्या पध्दतीने बॅग पुन्हा लॉक करण्याचा प्रयत्न केला. जितेंद्र हे मुंबईतील ठाणे येथील रहिवासी आहे.२७  ऑगस्टसला ते जयपूर येथील मूळ गावी जात होते, त्यावेळीस ही घटना मुंबई विमानतळ टर्मिनल २ येथे घडली.

जितेंद्र चौधरी यांच्याकडे जांभळ्या रंगाच्या बॅगमध्ये १० लाख रुपयांचे चेक ठेवण्यात आले होते. ते संध्याकाळी 6.55 वाजता निघालेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाइटने प्रवास करत होते. रात्री ९ वाजता जयपूरला उतरल्यावर चौधरी यांना बॅगेच्या जिपरमध्ये छेडछाड झाल्याचं दिसून आले. त्यामुळे त्यांनी बॅग उघडली तेव्हा त्याचे कपडे अस्ताव्यस्त असल्याचे आणि 10 लाख रुपये असलेली छोटी पिवळी बॅग गायब असल्याचे त्याला आढळले.