Elephanta Festival 2019: 1 आणि 2 जून रोजी घारापुरीच्या बेटांवर रंगणार जगप्रसिद्ध एलिफंटा महोत्सव; जाणून घ्या वेळापत्रक

यंदा 1 आणि 2 जून (शनिवार आणि रविवार) रोजी, युनेस्कोच्या जागतिक ठिकाणांच्या यादीत स्थान मिळालेल्या जगप्रसिद्ध एलिफंटा म्हणजेच घारापुरीच्या बेटांवर या महोत्सवाचे आयोजन केले आहे

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

1989 सालापासून मुंबईत भरणाऱ्या एलिफंटा महोत्सवाला (Elephanta Festival) दोन दिवसांत सुरुवात होणार आहे. यंदा 1 आणि 2 जून (शनिवार आणि रविवार) रोजी, युनेस्कोच्या जागतिक ठिकाणांच्या यादीत स्थान मिळालेल्या जगप्रसिद्ध एलिफंटा म्हणजेच घारापुरीच्या बेटांवर या महोत्सवाचे आयोजन केले आहे. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल (Jayakumar Rawal) यांनी ही माहिती दिली. नृत्य, संगीत आणि विविध कलांचे सादरीकरण आणि अविष्कार या महोत्सवात पहायला मिळते. उदयोन्मुख कलाकार आपल्या अनेक कला या महोत्सवात सादर करतात, म्हणूनही अगदी जगातून विविध पर्यटक हा महोत्सवाला हजेरी लावतात.

यावर्षीच्या महोत्सवाची संकल्पना  'स्वरंग'  अशी आहे. गीत, संगीत, गायन, पर्यटन, चित्रकला इत्यादी अनेक कला या दोन दिवसांत सादर केल्या जाणार आहेत. (हेही वाचा: आता केवळ 15 मिनिटांत पोहोचा एलिफंटा लेण्यांपर्यंत; नव्या 'रोपवे'चा प्रस्ताव मंजूर)

वेळापत्रक –

‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे सायंकाळी 6 वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी गायक कैलास खेर यांचा 'शिवआराधना' या विषयावरील सुराविष्कार सादर केला जाणार आहे.

सकाळी 11 ते दुपारी 3 – प्राचीन शिल्प, लेण्यांचे निरीक्षण आणि अभ्यासासाठी हेरिटेज वॉक (यामध्ये घारापुरीच्या बेटावरील शिल्प आणि लेण्यांचे दर्शन पर्यटकांना घडवले जाईल.)

सायंकाळी 7 - घारापुरीच्या बेटावर गीत, संगीत आणि चित्रकलेची अनोखी बैठक रंगणार आहे. यावेळी शास्त्रीय गायक राहुल देशपांडे, स्वप्नील बांदोडकर, प्रियांका बर्वे यांच्या गीतांचा कार्यक्रम होईल. त्यानंतर सुलेखनकार अच्युत पालव, चित्रकार वासुदेव कामत, व्यंगचित्रकार निलेश जाधव, शील कुंभार अशा प्रख्यात कलाकारांचा शिवतांडवशी नाते सांगणारा चित्र आविष्कार लाईव्ह पाहण्याची पर्वणी पर्यटकांना मिळणार आहे.