Sameer Wankhede Tenure End: एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंचा कार्यकाळ आज संपणार, आतापर्यंत त्यांच्या 'या' Raid आल्या चर्चेत

या प्रकरणी बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला 3 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती.

Sameer Wankhede | (Photo Credits: ANI)

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबई झोनचे संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा कार्यकाळ आज संपत आहे. त्यांनी सेवा मुदतवाढ मागितलेली नाही. एनसीबीने ही माहिती दिली आहे. वानखेडे यांना यापूर्वी सप्टेंबरमध्ये चार महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. समीर वानखेडे यांनी मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या (Mumbai Cruise Drugs Case) तपासाचे नेतृत्व केल्याने ते चर्चेत आले. या प्रकरणी बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला 3 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. समीर वानखेडे 2008 च्या बॅचचे भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी हे निवृत्त महाराष्ट्र पोलीस अधिकारी ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) यांचे पुत्र आहेत.

मुंबई झोनचे संचालक समीर वानखेडे यांचा कार्यकाळ 31 डिसेंबरला संपत असून, ते मुदतवाढ मागणार नाहीत, असे निवेदन एनसीबीने जारी केले होते. ऑगस्ट 2020 ते डिसेंबर 2020 पर्यंत त्यांनी 96 जणांना अटक केली आणि 28 गुन्हे दाखल केले. 2021 मध्ये त्यांनी 234 लोकांना अटक केली आणि 117 गुन्हे दाखल केले. एनसीबीने पुढे माहिती दिली की समीर वानखेडेंनी सुमारे 1000 कोटी रुपयांचे 1791 किलोपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त केले आणि 11 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता गोठवली. हेही वाचा High Alert In Mumbai: हाय अलर्ट! मुंबईत नवीन वर्षाच्या सुरूवातीला दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता, पोलिस प्रशासन सतर्क

समीर वानखेडे यांनी NCB मध्ये काम करण्यापूर्वी एअर इंटेलिजन्स युनिट (AIU) चे उपायुक्त आणि राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) अतिरिक्त एसपी म्हणून काम केले आहे.  यानंतर त्यांची कस्टम्सचे सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांची मुंबई विमानतळावर नियुक्ती करण्यात आली. मुंबई एअर इंटेलिजन्स युनिटसोबत काम करताना त्यांनी सीमाशुल्क चुकवणार्‍या अनेक सेलिब्रिटींना पकडले.

ऑगस्ट 2020 मध्ये सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ते एनसीबीमध्ये पोहोचले. प्रकरण स्वत:च्या हातात घेत त्यांनी 33 हून अधिक जणांना अटक केली. 2021 मध्ये उत्कृष्ट कामासाठी त्यांना 'होम मिनिस्टर्स मेडल' प्रदान करण्यात आले. अभिनेत्री रिया चक्रवर्तीपासून अनेक उच्च-प्रोफाइल बॉलीवूड सेलिब्रिटींची चौकशी आणि वानखेडे अंतर्गत NCB ने अटक केली. सप्टेंबर 2020 पासून ते केंद्रीय एजन्सीमध्ये प्रतिनियुक्तीवर होते.