Gram Panchayat Election 2022 Result: महाराष्ट्रातील 1166 ग्रामपंचायतींचा उद्या लागणार निकाल
राज्यातील एकूण राजकीय घडामोडी पाहता राज्यातील 1166 ग्रामपंचायतींचे निकाल पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Gram Panchayat Election 2022 Result: राज्यातील 1166 ग्रामपंचायतींसाठी 16 ऑक्टोबरला मतदान झाले. राज्य निवडणूक आयोगाने 07 सप्टेंबर 2022 रोजी 1 हजार 166 ग्रामपंचायतींचा निवडणूक (Election 2022) कार्यक्रम जाहीर केला होता. या निवडणुकीतून ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंचाची निवड होणार आहे. निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार उद्या, म्हणजे 17 ऑक्टोबर 2022 रोजी मतमोजणी होणार आहे.
जिल्हा व तालुकानिहाय ग्रामपंचायतीची संख्या -
ठाणे: कल्याण- 7, अंबरनाथ- 1, ठाणे- 5, भिवंडी- 31, मुरबाड- 35, व शहापूर- 79.
पालघर: डहाणू- 62, विक्रमगड- 36, जवाहार- 47, वसई- 11, मोखाडा- 22, पालघर- 83, तलासरी- 11 व वाडा- 70 ( पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत 711 सदस्य बिनविरोध तर १० सरपंच बिनविरोध आलेत, तर जिल्ह्यात पाच ग्रामपंचायती बिनविरोध आहेत )
रायगड: अलिबाग- 3, कर्जत- 2, खालापूर- 4, पनवेल- 1, पेण- 1, पोलादपूर- 4, महाड- 1, माणगाव- 3 व श्रीवर्धन- 1.
रत्नागिरी: मंडणगड- 2, दापोली- 4, खेड- 7, चिपळूण- 1, गुहागर- 5, संगमेश्वर- 3, रत्नागिरी- 4, लांजा- 15 व राजापूर- 10.
सिंदुदुर्ग: दोडामार्ग- 2 व देवडगड- 2. नाशिक:
इगतपुरी- 5, सुरगाणा- 61, त्र्यंबकेश्वर- 57 व पेठ- 71.
नंदुरबार: अक्कलकुवा- 45, अक्राणी- 25, तळोदा- 55 व नवापूर- 81.
पुणे: मुळशी- 1 व मावळ- 1.
सातारा: जावळी- 5, पाटण- 5 व महाबळेश्वर- 6.
कोल्हापूर: भुदरगड- 1, राधानगरी- 1, आजरा- 1 व चंदगड- 1.
अमरावती: चिखलदरा- 1.
वाशीम: वाशीम- 1.
नागपूर: रामटेक- 3, भिवापूर- 6 व कुही- 8.
वर्धा: वर्धा- 2 व आर्वी- 7.
चंद्रपूर: भद्रवाती- 2, चिमूर- 4, मूल- 3, जिवती- 29, कोरपणा- 25, राजुरा- 30 व ब्रह्मपुरी- 1.
भंडारा: तुमसर- 1, भंडारा- 16, पवणी- 2 व साकोली- 1.
गोंदिया: देवरी- 1, गोरेगाव- 1 गोंदिया- 1, सडक अर्जुनी- 1 व अर्जुनी मोर- 2.
गडचिरोली: चामोर्शी- 2, आहेरी- 2, धानोरा- 6, भामरागड- 4, देसाईगंज- 2, आरमोरी-2, एटापल्ली- 2 व गडचिरोली- 1
राज्यातील एकूण राजकीय घडामोडी पाहता राज्यातील 1166 ग्रामपंचायतींचे निकाल पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)