Petrol & Diesel Prices Today: इंधन दरवाढ कायम; मुंबई मध्ये पेट्रोल 53 पैसे तर डिझेल 58 पैशांनी वधारलं!

आज 27 मार्च दिवशी मुंबई मध्ये पेट्रोल 53 पैसे आणि डिझेल 58 पैशांनी वधारलं आहे त्यामुळे शहरात प्रति लीटर पेट्रोलसाठी 113.88 रूपये आणि डिझेलसाठी 98.13 रूपये मोजावे लागत आहेत.

Petrol, Diesel Prices Today | (Photo credit - File Manager)

भारतामध्ये पेट्रोल (Petrol), डिझेलच्या किंमतींमधील (Diesel Prices) दरवाढ आजही कायम आहे. जगात युक्रेन-रशिया युद्धाचे परिणाम पाहता इंधनदरवाढीचा अंदाज होता आणि आता हे अजून वाढण्याची शक्यता देखील बऊन दाखवली जात आहे. देशात 5 विधानसभा निवडणूक निकालांनंतर स्थिर ठेवण्यात आलेले इंधनदर पुन्हा भडकायला सुरूवात झाली आहे आज 27 मार्च दिवशी मुंबई मध्ये पेट्रोल 53 पैसे आणि डिझेल 58 पैशांनी वधारलं आहे त्यामुळे शहरात प्रति लीटर पेट्रोलसाठी 113.88 रूपये आणि डिझेलसाठी 98.13 रूपये मोजावे लागत आहेत. ही मागील 6 दिवसांमधील पाचवी दरवाढ आहे.

दरम्यान मुंबई प्रमाणे दिल्लीतही पेट्रोल, डिझेलचे दर शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत. पेट्रोल 50 पैसे तर डिझेल 55 पैशांनी वधारलं आहे. ही इंधनदरवाढ सामान्य जनतेला महागाईच्या माध्यमातून होरपळत आहे. सर्वसामान्यांचे सध्या आर्थिक गणित कोलमडले आहे.

मुंबई, दिल्ली सह प्रमुख शहरातील इंधन दर

शहर पेट्रोल दर (प्रति लीटर) डिझेल दर  (प्रति लीटर)
मुंबई Rs 113.88 Rs 98.13
दिल्ली Rs 99.11 Rs 90.42
चैन्नई Rs 104.90 Rs 95.00
कोलकाता Rs 108.53 Rs 93.57

महाराष्ट्र सरकारने  राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर चढते असताना सीएनजी वरील व्हॅट कमी करून थोडा दिलासा दिला आहे. 13 % वरून व्हॅट 3% वर आला आहे. त्यामुळे  1 एप्रिल 2022 पासून किलोमागे 7 ते 8 रुपयांची घट अपेक्षित आहे.   महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे पेट्रोलडिझेलचे दर इथे पहा.

सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. या मानकांच्या आधारे तेल कंपन्या दररोज पेट्रोल दर आणि डिझेल दर निश्चित करण्याचे काम करतात. डीलर म्हणजे पेट्रोल पंप चालवणारे लोक. कर आणि त्यांचे स्वतःचे मार्जिन जोडल्यानंतर ते किरकोळ दराने पेट्रोल विकतात.

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता. इंडियनऑयलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपी आणि आपला शहर कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहरासाठी कोड भिन्न आहे, जो आपल्याला आयओसीएल वेबसाइटवरून मिळेल.