Pune Road Accident: मद्यधुंद अवस्थेत चालकाचे कारवरिल नियंत्रण सुटले, एसयुव्हीची रिक्षाला धडक

पुण्यात 21 वर्षीय तरुणाने मद्यधुंद अवस्थेत एसव्ही कार चालवत ऑटोरिक्षाला धडक दिली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अपघातात चार जण जखमी झाले.

Pune Road Accident: मद्यधुंद अवस्थेत चालकाचे कारवरिल नियंत्रण सुटले, एसयुव्हीची रिक्षाला धडक
Pune road Accdient pc twitter

Pune Road Accident: पुण्यात 21 वर्षीय तरुणाने मद्यधुंद अवस्थेत एसव्ही कार  (SUV Car) चालवत ऑटोरिक्षाला धडक दिली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अपघातात चार जण जखमी झाले. हा अपघात (Accident) पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील जगताप डेअरी चौकात घडली आहे. या घटनेनंतर पोलिस प्रशसान घटनास्थळी दाखल झाले आहे. पुण्यातील वाढत्या अपघाताचे प्रमाण पाहून नागरिक चिंतेत आहे.  (हेही वाचा-  कारच्या धडकेत भटक्या कुत्र्याचा मृत्यू, चालकावर गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, एसव्ही कार चालक मद्यधुंद अवस्थेत होता. कार बेधडकपणे चालवत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या रिक्षाला धडक दिली. या धडकेत चार जण गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही धडक इतकी भीषण होती की, अपघातात कारच्या अक्षरश: चुराडा झाला आहे. रस्त्यावर काचा फुटल्या आहेत.

कार वरिल नियंत्रण सुटल्याने हा बॅरिगेटला धडक दिली त्यानंतर कारचे चाक निखळून रिक्षाला धडकली. रिक्षामधील चार प्रवाशी जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. कार चालकावर मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर रस्त्यावर वाहतुक सेवा विस्कळीत झाली. पोलिस या प्रकरणी पुढील तपासणी करत आहे.

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण अद्याप शांत झालेले नाही. दोन निष्पापांचा जीव घेतल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. त्यात आणखी काही घटना समोर येत आहे. त्यामुळे नागरिक चिंता व्यक्त करत आहे. पुणे पोलिस या प्रकरणी कंबर कसून कारवाई करत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 14, 2024 12:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).