Sanjay Raut On Manish Sisodia: केंद्र सरकार विरोधकांचा आवाज दाबत आहे, आम्ही सिसोदिया यांच्या पाठीशी उभे राहू; संजय राऊत यांचे भाजपवर टीकास्त्र

जो कोणी सरकारविरूद्ध प्रश्न विचारत आहे त्याला ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून अटक केली जात आहे. भाजपमध्ये काय हिमालयातून येणारे सर्व साधू बसले आहेत का? असा सवालही राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut | (Photo Credit - ANI/Twitter)

Sanjay Raut On Manish Sisodia: दिल्लीचे डेप्युटी सीएम मनीष सिसोदिया यांच्या अटकेनंतर अनेक पक्षातील विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, सिसोदिया विरोधात ज्या प्रकारे कारवाई केली गेली आहे, हे स्पष्ट आहे की केंद्र सरकार आपल्या विरोधकांचा आवाज दाबवण्याच प्रयत्न करत आहे. जो कोणी सरकारविरूद्ध प्रश्न विचारत आहे त्याला ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून अटक केली जात आहे. भाजपमध्ये काय हिमालयातून येणारे सर्व साधू बसले आहेत का? असा सवालही राऊत यांनी केला आहे.

लाइफ इन्शुरन्स (एलआयसी), एसबीआय, एलआयसी कोणी लुटले? मनीष सिसोडिया किंवा राहुल गांधी असो, ते सरकारला प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबतीत हे घडत आहे. (हेही वाचा -Manish Sisodia Arrested: मनीष सिसोदिया यांना अटक; जवळपास 8 तासांच्या चौकशीनंतर सीबीआयची कारवाई)

राऊत पुढे म्हणाले की, भाजपाने कितीही दडपले तरी. आम्ही बोलत राहू आणि आमचा पक्ष मनीष सिसोदियाबरोबर उभा राहिल. त्याच वेळी, सीबीआयच्या सूत्रांनी असा दावा केला आहे की, सोमवारी दुपारी 2 वाजता दिल्लीचे डिप्टी सीएम मनीष सिसोदिया यांना न्यायालयात हजर केले जाईल. कोर्टात सादर करण्यापूर्वी सीबीआय त्यांची वैद्यकीय चाचणीही घेईल.

मनीष सिसोदिया यांच्या अटकेनंतर आप पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपवर जहरी टीका केली. आपचे नेते सौरभ भारद्वाज म्हणाले की, केंद्र सरकारने आम आदमी पक्षाचे सुमारे 80 टक्के नेतृत्त्व असलेल्या नेत्याला अटक केली. डझनभर आमदार, नगरसेवक, लोकसभा, जिल्हा अध्यक्ष पोलिस कोठडीत आहेत. लोकशाही आणि स्वातंत्र्यासाठी हे संकेत चांगले नाहीत, असंही भारद्वाज यांनी म्हटलं आहे.