अक्कलकोट-सोलापूर प्रवासादरम्यान जातीचा दाखला गहाळ झाला; खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांची तक्रार

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी (Jay Siddheshwar Swami) यांनी आपला जातीचा दाखला (Caste Certificate) अक्कलकोट-सोलापूर प्रवासादरम्यान हरवल्याची तक्रार केली आहे. गेल्या आठवड्यात जयसिद्धेश्वर यांचे जात प्रमाणपत्र सोलापुरातील जात पडताळणी समितीने रद्द ठरवलं होतं. त्यामुळे जयसिद्धेश्वर महास्वामी यांची खासदारकी जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अशातचं आता जयसिद्धेश्वर स्वामी यांनी आपला जातीचा दाखल गहाळ झाल्याचं म्हटलं आहे.

अक्कलकोट-सोलापूर प्रवासादरम्यान जातीचा दाखला गहाळ झाला; खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांची तक्रार
Solapurs bjp mp Jaisiddheshwar Mahaswamijis (PC - Twitter)

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी (Jay Siddheshwar Swami) यांनी आपला जातीचा दाखला (Caste Certificate) अक्कलकोट-सोलापूर प्रवासादरम्यान हरवल्याची तक्रार केली आहे. गेल्या आठवड्यात जयसिद्धेश्वर यांचे जात प्रमाणपत्र सोलापुरातील जात पडताळणी समितीने रद्द ठरवलं होतं. त्यामुळे जयसिद्धेश्वर महास्वामी यांची खासदारकी जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अशातचं आता जयसिद्धेश्वर स्वामी यांनी आपला जातीचा दाखल गहाळ झाल्याचं म्हटलं आहे.

जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी सोलापूरमधील वळसंग पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली आहे. दरम्यान, जयसिद्धेश्वर स्वामी यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेले पुरावे बनावट असल्याचे जात पडताळणी समितीने म्हटलं होतं. मात्र, जात पडताळणी समितीने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं जयसिद्धेश्वर स्वामी यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आजा पुन्हा त्यांनी आपलं जात प्रमाणपत्र हरवल्याचं म्हटलं आहे. (हेही वाचा - सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द)

लोकसभा निवडणुकीत जयसिद्धेश्वर स्वामी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला होता. त्यावेळी जयसिद्धेश्वर यांनी बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र जोडले होते. जयसिद्धेश्वर यांच्या जात वैधता प्रमाणपत्राविरोधात प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे आणि विनायक कंडकुरे यांनी तक्रार दाखल केली होती. 15 फेब्रुवारी रोजी या प्रकरणावर सुनावणी करण्यात आली होती. त्यावेळी दक्षता समितीने त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द केलं होतं. पंरतु, आता जयसिद्धेश्वर स्वामी यांनी आपलं जात प्रमाणपत्र प्रवासात हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत अधिक वाढली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Feb 27, 2020 04:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).