Palghar Suicide Case: पालघरमध्ये झाडाला लटकलेल्या अवस्थेत एका पुरूष आणि स्त्रीचा आढळला मृतदेह

अशी पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली.

Suicide | Representational Image (Photo Credits: Pixabay)

एकीकडे कोरोना विषाणू (Corona Virus) कहर करत असताना दुसरीकडे गुन्हे थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. महाराष्ट्रातील (Maharashtra) पालघर (Palghar) येथील एका पुरुष आणि एका महिलेचे मृतदेह (Dead Body) झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळल्याचे एक अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. अशी पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. या प्रकरणी कोणतीही सुसाईड नोट (Suicide note) सापडली नाही आहे. या मृत दोघांचे प्रेमप्रकरण असल्याने त्यांना घरातून परवानगी मिळाली नाही. यामुळे त्यांनी असे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. असे तलासरी पोलीस ठाण्याचे (Talasari Police Station) निरीक्षक अजय वसावे (Inspector Ajay Vasave) यांनी सांगितले.

एका 23 वर्षीय पुरुष आणि 22 वर्षीय महिलेचे मृतदेह रविवारी पालघरच्या वडावली गावाच्या बाहेरील बाजूस एका झाडाला लटकलेले आढळले. यामुळे दोन्ही कुटुंबातील सदस्यांना धक्का बसला आहे. या दोघांनीही असे पाऊल उचलल्या मागचा कारण त्यांच्या कुटूंबियांनाहील कळलं नाही आहे. ते मृत आढळण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटस म्हणून पोस्ट केले होते. अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

प्रेमप्रकरणांतून आत्महत्या करण्याच्या वारंवार घडत असतात. अशा घटना वेळोवेळी समोर आल्या आहेत. यातून अनेक लोकांचे नाहक जीव गेले आहेत. देशात आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये अशा घटनांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यानंतर कौटुंबिक वादातून होणाऱ्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान काही जण सोशल मीडियावर आत्महत्येची कबुली देत आत्महत्या करतात. या घटना मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत. अशा घटनेत आत्महत्या करण्याऱ्याला काही अंशी वाचवले जाते.