Mumbai: सामान्यांच्या टीकेनंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने गेल्या 15 दिवसात 5,762 खड्डे भरले
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) गेल्या 15 दिवसात 5,762 खड्डे भरले आहेत. रस्ते आणि वाहतूक विभागाची (Department of Roads and Transportation) आकडेवारी दर्शवते की 15 ऑक्टोबरपर्यंत नागरी अभियंते आणि ठेकेदारांनी 51,691 खड्डे दुरुस्त केले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) गेल्या 15 दिवसात 5,762 खड्डे भरले आहेत. रस्ते आणि वाहतूक विभागाची (Department of Roads and Transportation) आकडेवारी दर्शवते की 15 ऑक्टोबरपर्यंत नागरी अभियंते आणि ठेकेदारांनी 51,691 खड्डे दुरुस्त केले. खराब रस्ते आणि खड्ड्यांवर नगरसेवक आणि वाहन चालकांकडून टीका झाल्यानंतर महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Municipal Commissioner Iqbal Singh Chahal) यांनी 28 सप्टेंबर रोजी आढावा बैठक बोलावली होती. त्यानंतर रस्ते विभागाला पुढील तीन आठवड्यांत सर्व खड्डे दुरुस्त करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर नागरी संस्थेने शहरभरातील सर्व रस्त्यांवर खड्डे भरण्यास सुरुवात केली. आकडेवारीनुसार, 30 सप्टेंबरपर्यंत नागरी संस्थेने 45,929 खड्डे भरले होते. चहल यांनी सर्व सहाय्यक महापालिका आयुक्तांना खड्ड्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करण्यासाठी त्यांच्या वॉर्डांना भेटी देण्यास सांगितले होते.
15 ऑक्टोबरपर्यंत आम्ही 51,691 खड्डे दुरुस्त केले आहेत. आतापर्यंत 3,218 मेट्रिक टन शीत मिक्स मटेरियल वॉर्डांना दुरुस्तीच्या कामांसाठी वितरित करण्यात आले आहे. पाऊस पडत नसल्याने, उर्वरित खड्डे देखील पुढील काही दिवसात भरले जातील, असे बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. हेही वाचा Mumbai: काय सांगता? BMC कडे आहेत तब्बल 82,410 कोटींच्या 343 FD, तरी मुंबईमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव
बीएमसीने प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि खड्डे भरण्यासाठी प्रत्येक वॉर्डासाठी 2 कोटी रुपये दिले होते. आकडेवारी दाखवते की सर्वाधिक 34,074 खड्डे रस्ते विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भरले होते, तर उर्वरित कंत्राटदार आणि वॉर्ड-स्तरीय कामगारांनी भरले होते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)