Thane Shocker: मुंब्रा स्थानकामध्ये 43 वर्षीय व्यक्तीला ट्रेनमधून बाहेर खेचून बेदम मारहाण; व्यक्तीचा मृत्यू
पोलिसांकडून सुरूवातीला शेख यांचा मृत्यू अपघाती मृत्यू असल्याचं डेथ रिपोर्टमध्ये नमूद केले होते पण पोस्ट मार्टम आणि टेक्निकल डेटा पाहून एफआयआर मध्ये काही बदल केले असून कलम 304 आणि 34 यांचा समावेश करण्यात आला आहे.
ठाणे (Thane) जिल्ह्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकामध्ये (Mumbra Railway Station) एका व्यक्तीला ट्रेनमधून खाली उतरवून बेदम मारल्याचा प्रकार समोर आला आहे. 3 जणांकडून करण्यात आलेल्या या मारहाणीत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवार(4 जानेवारी) दिवशी ठाणे रेल्वे पोलिसांकडून (Thane Railway Police) ही माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान मारहाण करण्यात आलेल्या तीन जणांची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. ही मारहाणीची घटना 1 जानेवारीच्या रात्री 10 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास घडली आहे. अंबरनाथला जाणार्या लोकल ट्रेन मधून Kamaluddin Ansar Shaikh या व्यक्तीला खेचून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला मारहाण झाल्याची माहिती ठाणे रेल्वे पोलिसांनी दिली आहे. शेख याला मारहाण झाली तेव्हा ते मद्यधुंद अवस्थेमध्ये होते. मारहाणीनंतर जखमी अवस्थेमध्ये त्याला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते पण उपचारादरम्यान काल रात्री त्याचा मृत्यू झाला. नक्की वाचा: Mumbai Crime: प्रियकराला भेटण्यासाठी परवानगी नाकारल्याने संतापलेल्या 17 वर्षीय मुलीने केली आईची हत्या, आरोपीचा शोध सुरू .
पोलिसांकडून सुरूवातीला शेख यांचा मृत्यू अपघाती मृत्यू असल्याचं डेथ रिपोर्टमध्ये नमूद केले होते पण पोस्ट मार्टम आणि टेक्निकल डेटा पाहून एफआयआर मध्ये काही बदल केले असून कलम 304 आणि 34 यांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून मारहाण आणि हत्येमागील कारण शोधलं जात आहे तसेच मारेकरी तीन जण कोण होते याचा देखील तपास सुरू आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 05, 2023 09:07 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

