ठाणे स्थानकात कचऱ्याच्या डब्ब्यात चहाचे ग्लास धुणाऱ्या उपहारगृहाला रेल्वे प्रशासनाकडून 1 लाखांचा दंड

ठाणे (Thane) रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरील कँटीन जवळच एक व्यक्ती कचऱ्याच्या डब्ब्यात चहाचे ग्लास धूत असल्याचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता, रेल्वेने संबंधित उपहारगृहाच्या ठेकेदारावर कठोर करावी करता अशा बेजबाबदारीसाठी 1 लाख रुपयांचा दंड सुनावला आहे

Thane Railway Station Viral Video (Photo Credits: Twitter)

ठाणे (Thane) रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरील कँटीन जवळच एक व्यक्ती कचऱ्याच्या डब्ब्यात चहाचे ग्लास धूत असल्याचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता, मंदार अभ्यंकर नामक एका दक्ष प्रवाशाने ही बाब सर्वांसमोर आणली होती, यानंतर रेल्वे प्रशासन नेमके काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष होते, यातच आता समोर आलेल्या माहितीनुसार, रेल्वेने संबंधित उपहारगृहाच्या ठेकेदारावर कठोर करावी करता अशा बेजबाबदारीसाठी 1 लाख रुपयांचा दंड सुनावला आहे. अशा प्रकारचे काम हे ग्राहकांच्या आरोग्याची हेळसांड करणारे आहे हे स्पष्ट असून अशा गोष्टींना रोख लावणे गरजेचे आहे याच विचारातून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडीओ मध्ये नेमकं होत काय?

मंदार अभ्यंकर नामक एका व्यक्तीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करत ठाणे स्थानकातील हा प्रकार समोर आणला. येथील एक व्यक्ती आपली बनियान या धुवून त्याच पाण्यात कँटीन मध्ये वापरले जाणारे चहाचे ग्लास बुचकळत असल्याचे यात दिसून आले होते. अभ्यंकर यांनी या व्हिडीओ मध्ये मध्य रेल्वे प्रशासन आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना देखील टॅग केले होते.

दरम्यान, रेल्वेनंही या व्हिडीओची दखल घेतल्याचं ट्विट करून याचा तपास केला होता, व्हिडिओमध्ये तथ्य असल्याने आता या उपहारगृहाच्या मालकावर अशी कारवाई करण्यात आली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif