Thane Pride March 2025: ठाण्यात पहिल्यांदाच 31 मे रोजी निघणार LGBTQ+ प्राईड परेड; जाणून घ्या वेळ व ठिकाण
प्राइड मार्च ही एक रॅली आहे, जिथे एलजीबीटीक्यू+ समुदाय आणि त्यांचे समर्थक एकत्र येतात आणि त्यांच्या हक्कांसाठी, समानतेसाठी आणि सामाजिक स्वीकृतीसाठी आवाज उठवतात. आता याबाबत ठाणे शहर 31 मे 2025 रोजी इतिहास रचणार आहे, कारण येथे प्रथमच एलजीबीटीक्यू+ प्राइड मार्च (Thane Pride March) आयोजित होत आहे.
दरवर्षी जून महिना हा जगभरात ‘प्राइड मंथ’ (Pride Month) म्हणून ओळखला जातो. हा महिना लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर आणि क्विअर (LGBTQ+) समुदायाचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि त्यांच्या सन्मानासाठी समर्पित आहे. या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी ‘प्राइड मार्च’चे आयोजन केले जाते. प्राइड मार्च ही एक रॅली आहे, जिथे एलजीबीटीक्यू+ समुदाय आणि त्यांचे समर्थक एकत्र येतात आणि त्यांच्या हक्कांसाठी, समानतेसाठी आणि सामाजिक स्वीकृतीसाठी आवाज उठवतात. आता याबाबत ठाणे शहर 31 मे 2025 रोजी इतिहास रचणार आहे, कारण येथे प्रथमच एलजीबीटीक्यू+ प्राइड मार्च (Thane Pride March) आयोजित होत आहे.
ठाणे प्राइड फेस्टिव्हल (TPF) या स्थानिक समुदाय-चालित व्यासपीठाचा हा उपक्रम असून, ही मिरवणूक संध्याकाळी 4.30 वाजता नितीन कंपनी जंक्शन येथून सुरू होऊन तलाव पाली येथे संध्याकाळी 7 वाजता समाप्त होईल. हा कार्यक्रम ठाण्यातील एलजीबीटीक्यू+ समुदायाच्या दृश्यमानतेला चालना देणारा, समानता आणि स्वीकृतीचा संदेश देणारा असेल. ठाणे आणि आसपासच्या भागातील नागरिकांसाठी, हा प्राइड मार्च सामाजिक समावेशकतेचा एक नवीन अध्याय आहे.
ठाणे प्राइड मार्च हा पूर्णपणे समुदाय-चालित आणि लोकनिधीवर (Crowd-Funded) आधारित उपक्रम आहे, ज्याला कोणत्याही कॉर्पोरेट किंवा ब्रँड प्रायोजकांचा पाठिंबा नाही. ठाणे प्राइड फेस्टिव्हलने ठाणे पोलीस आणि वाहतूक विभागाकडून सर्व आवश्यक परवानग्या मिळवल्या आहेत, ज्यामुळे मिरवणुकीची सुरक्षा वाहतूक अंमलबजावणी सुनिश्चित होईल. या मिरवणुकीत इंद्रधनुषी झेंडे, रंगीबेरंगी पोशाख, आणि समानतेचे संदेश देणारे फलक पाहायला मिळतील. स्वीकार- द रेनबो पॅरेंट्स आणि सतीश प्रभान ज्ञानसाधना कॉलेज, ठाणे, हे या उपक्रमाचे समुदाय भागीदार आहेत, ज्यांचा पाठिंबा एलजीबीटीक्यू+ समुदायाच्या एकजुटीसाठी महत्त्वाचा आहे.
आयोजकांनी सर्व सहभागींसाठी सुरक्षित आणि आनंददायी अनुभव सुनिश्चित करण्यासाठी स्वयंसेवक आणि सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. ठाणे प्राइड मार्च केवळ उत्सव नाही, तर एक सामाजिक चळवळ आहे, जी एलजीबीटीक्यू+ समुदायाच्या हक्कांसाठी लढते. या मार्चद्वारे समान हक्कांसाठी वकिलीही केली जाते. ज्यामध्ये समलैंगिक विवाह, दत्तक घेण्याचा हक्क, आणि भेदभावविरोधी कायद्यांसाठी आवाज उठवणे, यांचा समावेश आहे.
Thane Pride March 2025:
View this post on Instagram
ठाणे प्राईड महोत्सवाचे नेतृत्व तीन मुख्य आयोजक करत आहेत- नक्षत्र बागवे, जय कोम्मना आणि श्रे. यांनी यापूर्वी वसई (2023) आणि विरार (2024) येथे आयोजित वसई-विरार प्राइड फेस्टिव्हल (VVPF) च्या बॅनरखाली यशस्वी प्राइड कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दरम्यान, जागतिक स्तरावर, प्राइड मार्च 1969 च्या न्यूयॉर्कमधील स्टोनवॉल दंगलींच्या स्मरणार्थ आयोजित केले जातात, ज्याने आधुनिक एलजीबीटीक्यू+ हक्क चळवळीला चालना दिली.
(The above story first appeared on LatestLY on Aug 14, 6678 05:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

