ठाणे: गॅस गळतीमुळे घराला आग, दुर्घटनेत 4 जण जखमी

कळवा (Kalwa) येथील न्यू शिवाजी नगर परिसरात आज (30 जून) सकाळी एका घराला आग लागल्याची घटना घडली.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

कळवा (Kalwa) येथील न्यू शिवाजी नगर परिसरात आज (30 जून) सकाळी एका घराला आग लागल्याची घटना घडली. गॅस सिलिंडरमधून गळती झाल्याने ही आग लागल असल्याचे सांगण्यात येत आहे.. मध्ये एकाच कुटुंबातील चार जण भाजले आहेत. जखमी झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कळव्यातील न्यू शिवाजी नगर भागातील रहिवासी रघुनाथ पाटील यांच्या घरात रविवारी सकाळी गॅस सिलिंडरमधून गळती झाल्याने आग लागली. या आगीत रघुनाथ पाटील,संपदा पाटील, मुलगी रोहिणी, मुलगा रोहन हे चारही जण भाजले. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातील एका अधिकाऱ्याने अधिक वृत्त दिले.(प्रेमासाठी नकार दिल्याने तरुणाची कृष्णा नदीत उडी मारुन आत्महत्या)

माहितीनुसार, 'कळवा पूर्वेकडील न्यू शिवाजी नगरातील दत्त मंदिराजवळ रघुनाथ पाटील यांच्या घरात आग लागल्याची माहिती विभागाला मिळाली. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि बंब घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर आग आटोक्यात आणली. आगीत भाजलेल्या चौघांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, घरगुती सिलिंडरमधून गॅस गळती झाल्याने आग लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now