ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ: मुंब्रा-कळवा ते बेलापूर चे उमेदवार, महत्त्वाच्या लढती आणि निकाल घ्या जाणून

ठाणे जिल्ह्यातील मतदारसंघांचा एक आढावा सादर करत आहोत. यामध्ये मुख्य ठाणे शहर (Thane City), मुंब्रा-कळवा (Mumbra-Kalwa), ओवळा-माजीवडा (Ovla- Majiwada), कोपरी-पाचपाखाडी (Kopri- Pachpakhadi), ऐरोली (Airoli), आणि बेलापूर (Belapur) या जागांचा समावेश आहे.

ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ (Photo Credits: File Image)

Maharashtra Assembly Elections 2019: मुंबईच्या उत्तरेकडे वसलेले ठाणे (Thane) शहर हे राजकीय दृष्टीने अतिशय महत्वाचे मानले जाते. 2014 आधी ठाणे जिल्ह्यात पालघरचा सुद्धा समावेश होता हा भाग मागील निवडणुकीच्या आधी वेगळा करण्यात आला. येत्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या  निमित्ताने ठाणे जिल्ह्यात राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. ठाणे जिल्ह्यातील 7  तालुक्यांमध्ये एकूण 18 मतदारसंघ आहेत. यापैकी पूर्वीपासून अनेक ठिकाणे ही युतीच्या हातात आहेत तर ऐरोली आणि मुंब्रा- कळवा सहित केवळ 3 मतदारसंघ हे राष्ट्रवादीच्या हातात आहेत. यंदा 21 ऑक्टोबर रोजी 288 मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तत्पूर्वी ठाणे जिल्ह्यातील मतदारसंघांचा एक आढावा सादर करत आहोत. यामध्ये मुख्य ठाणे शहर (Thane City), मुंब्रा-कळवा (Mumbra-Kalwa), ओवळा-माजीवडा (Ovala- Majiwada), कोपरी-पाचपाखाडी (Kopri- Pachpakhadi), ऐरोली (Airoli), आणि बेलापूर (Belapur)  या जागांचा समावेश आहे.

ओवळा-माजीवडा विधानसभा मतदारसंघ

शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांनी 2009 पासून ओवळा- माजीवडा येथे सेनेची खिंड लढवली आहे. यंदा सुद्धा आमदारकीची जागा हातात कायम ठेवण्यासाठी शिवसेनेने सरनाईक यांना तिकीट दिले आहे. काँग्रेसतर्फे या जागेसाठी विक्रांत चव्हाण आणि मनसे तर्फे संदीप पाचंगे हे उमेदवार सरनाईक यांना आव्हान देणार आहेत.

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ

कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून मागील दोन निवडणुकांपासून शिवसेनेचे एकनाथ शिंदे निवडून येत आहेत. साहजिकच यंदा सुद्धा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र यंदा काँग्रेसचे उमेदवार संजय घाडीगावकर हे देखील कडवी झुंज देण्यास सज्ज आहेत. तर मनसे तर्फे महेश कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ

ठाणे मूळ शहर मतदारसंघात यंदा विद्यमान आमदार संजय केळकर यांना भाजपाकडून तिकीट देण्यात आली आहे. तर त्यांच्याविरुद्ध मनसेने अविनाश जाधव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. ठाणे मतदारसंघात यंदा केवळ दुहेरी लढत असल्याने ठाणेकरांचा कौल कोणाच्या बाजूने येतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघ

मुंब्रा-कळवा मतदारसंघ हा 2009 आणि 2014 च्या निवडणुकीपासून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या हातात आहे. मात्र यंदा आव्हाडांना अआव्हान देण्यासाठी शिवसेनेने सेलिब्रिटी उमेदवार दीपाली सय्यद यांना तिकीट दिले आहे. याशिवाय आम आदमी पक्षाचे उमेदवार अल्तमाश फैझीद हे देखील तागडे उमेदवार आहेत. यंदा फैझीद यांना एमआयएम पक्षाचा पाठिंबा ही लढत चुरशीची होऊ शकते.

ऐरोली विधानसभा मतदारसंघ

मागील दोन निवडणुकांपासून हा मतदारसंघ पूर्णतः राष्ट्रवादीच्या हातात होता, संजय नाईक यांनी मोठा मताधिक्याने याठिकाणी विजय मिळवला होता, मात्र यंदा राष्ट्रवादीतर्फे नाईक यांच्या ऐवजी गणेश शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर भाजपाने शिंदे त्यांच्या विरुद्ध गणेश नाईक आणि मनसेने निलेश बाणखेले यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

बेलापूर विधानसभा मतदारसंघ

बेलापूर मधून भाजपाने विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. म्हात्रे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी तर्फे अशोक गावडे व मनसेतर्फे गजानन काळे या उमेदवारांचे आव्हान असणार आहे. 2009 साली हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या हातात होता तर 2014 मध्ये भाजपाने बाजी मारली होती.

दरम्यान सध्या कार्यरत असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपणार आहे. 21 सप्टेंबरला निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू करत निवडणूकीची तारिख जाहीर केली आहे. 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर 24 ऑक्टोबरला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now