Child Sex Harassment Cases | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Thane Crime News: ठाणे पोलिसांनी दोन वेगवेगळ्या बाल लैंगिक छळ (Child Sexual Harassment) प्रकरणात दोन व्यक्तींना अटक केली आहे. यातील पहिल्या प्रकरणात अटक झालेला व्यक्ती 38 वर्षांचा असून तो सुरक्षा रक्षक आहे. दुसऱ्या प्रकरणात एका 20 वर्षीय व्यक्तीने 12 वर्षांच्या मुलास निवासी संकुलातील लिफ्टमध्ये कथीरित्या अयोग्य पद्धतीने स्पर्श केला. तसेच, त्याला मानसिक धक्का बसेल असे कृत्य केले. पीडितताने घडल्या प्रकाराबाबत आपल्या आईस माहिती दिल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली. दोन्ही प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, प्रकरणाचा तपास सुरु आहे.

आठ वर्षीय मुलाचा लैंगिक छळ

प्रकरण पहिले: या घटनेमध्ये पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केलेला व्यक्ती सुरक्षा रक्षक आहे. हा व्यक्ती ज्या गृहसंकुलात कामास होता त्याच संकुलात असलेल्या एका घरातील आठ वर्षांच्या मुलाचा लैंगिक छळ केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पोलिसांनी सांगिले की, प्राप्त तक्रारीनुसार, सदर घटना 26 जानेवारी रोजी रात्री 8.25 वाजणेच्या दरम्यान घडली. आरोपीने पीडित मुलास कथीत रित्या गृहसंकुलातील निर्जन ठिकाणी म्हणजेच कोणीही येजा करत नसलेल्या ठिकाणी नेले आणि तिथे त्याला अयोग्य पद्धतीने स्पर्ष केला. घडला प्रकार पीडिताने आपल्या आईला सांगितल्यानंर सदर सुरक्षा रक्षकाविरोधात पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन लैंगिक छळ आणि पोक्सो कायद्याच्या संबंधित कलमांसाठी बीएनएस कलम ७५ अंतर्गत एफआयआर दाखल केला. पुढील तपास सुरू आहे. (हेही वाचा, Daund English Medium School: वर्गातील मुलीवर बलात्कार आणि हत्या करण्यासाठी शाळेतील मित्रास 100 रुपयांची सुपारी, दौंड येथे धक्कादायक प्रकार)

सोसायटीच्या लिफ्टमध्ये 12 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ

प्रकरण दोन: हे प्रकरण देखील ठाणे जिल्ह्यातील असून या प्रकरणात एका 20 वर्षीय तरुणास ताब्यात घेण्यात आले आहे. हा तरुण मुळचा बिहार राज्यातील गोपाळगंज येथील राहणारा आहे. त्याच्यावर 12 वर्षीय मुलीचा लिफ्टमध्ये लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. आरोपीच्या गैरवर्तनामुळे घाबरलेल्या मुलीने तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती पालकांना दिली. आरोपी हा पीडितेच्या घराशेजारी कामगार म्हणून काम करतो. पीडितेच्या पालकांनी पोलिसांमध्ये तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधता पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणातही तपास सुरू केला आणि आरोपीला अटक केली.

महिला, बालक आणि नागरिकांना तत्काळ मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक:

चाइल्डलाइन इंडिया – 1098; हरवलेली मुले आणि महिला – 1094; महिला हेल्पलाइन - 181; महिला हेल्पलाइनसाठी राष्ट्रीय आयोग – 112; राष्ट्रीय महिला आयोग हिंसेविरुद्ध हेल्पलाइन – 7827170170; पोलीस महिला आणि ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन - 1091/1291.

बाल लैंगिक छळ म्हणजे काय?

बाल लैंगिक छळ म्हणजे अल्पवयीन मुलांप्रती कोणत्याही प्रकारची अनुचित लैंगिक वर्तणूक होय. यामध्ये अयोग्य स्पर्श, लैंगिक सामग्रीच्या संपर्कात येणे किंवा मुलाचे लैंगिक शोषण किंवा हानी करणाऱ्या इतर कोणत्याही कृतींचा समावेश असू शकतो. हा एक गंभीर गुन्हा आहे आणि पीडितेच्या मानसिक आणि भावनिक कल्याणावर त्याचा दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला याचा अनुभव येत असेल, तर अधिकाऱ्यांकडून किंवा सहाय्यक संस्थांकडून त्वरित मदत घेणे महत्त्वाचे आहे.