Thane: ठाणेकरांनो लक्ष द्या! ठाणे-घोडबंदर मुख्य रस्त्यावर जड वाहनांसाठी 14 जुलैपर्यंत प्रवेश आणि निर्गमन बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग
सदर वेळी ठाणे पोडबंदर वाहिनीवर ठराविक ठिकाणी जड अवजड वाहनांच्या वाहतुकिसाठी मुख्य रस्ता बंद करावा लागणार आहे. परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहणे जनतेच्या सोईसाठी आवश्यक आहे, म्हणून पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत.
सध्या मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचे बांधकाम वेगाने सुरू आहे. यामध्ये ठाण्यातील कासारवडवली परिसरातील मेट्रो लाईन 4 चे कामही प्रगतीपथावर आहे. एमएमआरडीएच्या देखरेखीखाली 22 जून ते 14 जुलै दरम्यान, नागलाबंदर सिग्नल ते इंडियन ऑइल पंप पर्यंत बीम बसवले जाणार आहेत. यामुळे घोडबंदर रोड दररोज रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत मोठ्या आणि जड वाहनांसाठी बंद ठेवण्याचे नियोजन आहे. तसेच हलक्या वाहनांना पर्यायी मार्ग अवलंबावा लागेल. ठाण्याच्या वाहतुकीसाठी हे बदल महत्त्वाचे असल्याने, या बंदमुळे सध्याची गर्दी वाढू शकते.
एमएमआरडीएने बीम बसवण्यावर लक्ष केंद्रित केल्याने ठाणे-घोडबंदर मुख्य रस्त्यावर अधूनमधून वाहतुकीबाबत समस्या उद्भवू शकतात. सदर वेळी ठाणे पोडबंदर वाहिनीवर ठराविक ठिकाणी जड अवजड वाहनांच्या वाहतुकिसाठी मुख्य रस्ता बंद करावा लागणार आहे. परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहणे जनतेच्या सोईसाठी आवश्यक आहे, म्हणून पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. पोलीस, अग्निशमन विभाग, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर वापरणाऱ्या महत्त्वाच्या सेवांवर मर्यादा नाहीत.
वाहतूक बदल-
प्रवेश बंद-
1) ठाणे घोडबंदर वाहिनीवरील गायमुख स्टेशनचे & U Grider चे काम करताना, घोडबंदरच्या दिशेने जाणान्या सर्व जड अवजड वाहनांना पिलर नं. 85 जवळ 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग-
अ) ठाणे घोडबंदर वाहिनीवर गायमुख स्टेशनचे & U Grider चे काम करताना सर्व जड अवजड वाहने पिलर नं. 85 जवळून विरुध्द दिशेने घोडबंदर ठाणे मुख्य मार्गावरून पुढे जाऊन, पुढे पिलर नं. 102 येथून डावे बाजुस वळण घेऊन, पुढे इंडियन ऑईल पंपसमोर मुख्य रस्त्यामार्गे इच्छित स्थळी जातील.
ब) घोडबंदर ठाणे वाहिनीवर गायमुख स्टेशनचे & U Grider चे काम करताना, सर्व प्रकारची हलकी वाहने पिलर नं. 85 जवळून सर्व्हिस रोडने जाऊन पुढे इंडियन ऑईल पंपसमोर मुख्य रस्त्याने इच्छित स्थळी जातील. (हेही वाचा: Mumbai Pune Expressway Speed Limit: भोर घाटात अवजड वाहनांसाठी वेगमर्यादा वाढण्याची शक्यता)
प्रवेश बंद-
2) घोडबंदर ठाणे वाहिनीवर गर्डरचे काम करताना, ठाणेच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना नागला बंदर व आशा वाईन शॉपजवळ 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग-
घोडबंदर ठाणे वाहिनीवर नागला बंदर पुढे & U Grider चे काम करताना सर्व प्रकारच्या वाहनांना नागला बंदर डिपी 72,73 व आशा वाईन शॉप येथून सर्व्हिस रोडने जाऊन लोढा स्प्लेन्ड्रा येथे घोडबंदर ठाणे वाहिनी मुख्य मार्गावरुन इच्छीत स्थळी जातील.
(The above story first appeared on LatestLY on Jun 23, 2025 12:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

