Thackeray Faction BMC Morcha: मेट्रो सिनेमा ते थेट बीएमसी मुख्यालय, शिवसेना (UBT) मोर्चाचा मार्ग ठरला, मुंबई पोलीसांच्या परवानगीची प्रतीक्षा
आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी 1 जुलै ही तारीखही निश्चित करण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबई महापालिकेवर (Brihanmumbai Municipal Corporation) मोर्चा काढण्याचे पक्के केले आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी 1 जुलै ही तारीखही निश्चित करण्यात आली आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्याने मोर्चाबाबत अनिश्चितता आहे. दरम्यान, पोलिसांच्या भूमिकेनंतर शिवसेना (Shiv Sena- UBT) नेत्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यात मोर्चाच्या मार्गात बदल करण्याबाबत चर्चा झाली. या चर्चेनंतर ठाकरे गटाने मोर्चाचा मार्गही बदलला आहे. त्यामुळे आता तरी मुंबई पोलीस (Mumbai Police) ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी देणार का? याबाबत उत्सुकता आहे.
मुंबई पोलिसांनी केलेल्या सूचनेनुसार आता नव्या मार्गावरुन मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. नव्या मार्गाच्या उल्लेखासह ठाकरे गटाकडून पोलिसांना नव्याने पत्र दिले जाणार आहे. मोर्चासाठी आगोदर निवडलेला मार्ग हा मेट्रो सिनेमा ते टाईम्स ऑफ इंडिया इमारत ते पालिका असा होता. मात्र, त्याला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे आता मोर्चाचा मार्ग बदलून तो मार्ग मेट्रो सिनेमा ते थेट महानगर पालिका कार्यालय असा निश्चित करण्यात आला आहे. त्यालातरी पोलीस परवानगी देणार का याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Shiv Sena (UBT) March On BMC on July 1: उद्धव ठाकरे यांची घोषणा, Aaditya Thackeray यांच्या नेतृत्वात शिवसेना (UBT) चा मुंबई मनापावर विराट मर्चा)
मुंबई महापालिकेच्या गेट क्रमांक दोनच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर स्टेज उभारण्यात येईल. त्याच ठिकाणी भाषणं होतील. या मार्गाचा पाहणी करण्यासाठी स्वत: पोलीस अधिकारी आणि ठाकरे गटाचे नेतेही होते. त्यामुळे या मार्गाला परवानगी मिळू शकते, अशी माहिती आहे. (हेही वाचा, Court Summons Uddhav Thackeray, Sanjay Raut: उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना शिवडी कोर्टाचे समन्स, 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश)
मुंबई महापालिकेवर सध्या कोणाचाच अंकूश नाही. निवडणुका न झाल्याने नगरसेवक नाहीत. सर्वसामान्य नागरिकांना पालिका अधिकारी दाद देत नाहीत. दुसऱ्या बाजूला पालिकेचा पैसा वारेमाप पद्धतीने खर्च केला जातो आहे. ज्यात मुंबईकरांचे नुकसान होते आहे. कॅगच्या अहवालावरुन पालिकेची एसआयटी चौकशी तर सुरु आहे. मात्र, पोलिकेत सध्या होत असलेल्या भ्रष्टाचाराचे काय? असे मुद्दे उपस्थित करत स्वत: आदित्य ठाकरे या मोर्चाचे नेतृत्व करत आहेत.