Pune News: पुण्यात कार आणि टेम्पोच्या धडकेत तीन जण ठार तर तीन जण जखमी

पुण्यातील तळेगाव ढमढेरे- न्हावरे रस्त्यावर कार आणि टेम्पोच्या धडकेत भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत दोन्ही गाड्याचे भरपूर नुकसान झाले आहे.

Pune News: पुण्यात कार आणि टेम्पोच्या धडकेत तीन जण ठार तर तीन जण जखमी
Accident (PC - File Photo)

Pune News: पुण्यातील (Pune) रस्त्यांवर अपघातांची मालिका ही सुरुच आहे. रविवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास तळेगाव ढमढेरे- नाव्हरे रस्त्यावर भीषण अपघात झाला. भरधाव टेम्पोची धडक कारला लागली. या दुर्घटनेता ३ जण जागीच ठार झाले आहे. तर तीन जणांना जखम झाल्याचे समजले आहे. रविवारच्या संध्याकाळी ही घटना घडली. या दुर्घटनेच दोन्ही वाहनांचा मोठं नुकसाना झाल आहे. या अपघाताची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, तळेगाव ढमढेरे- न्हावरे रस्त्यावर कार आणि टेम्पोच्या धडकेत भीषण अपघात झाला. तोडकर वस्तीजवळ हा अपघात सांयकाळी सहाच्या सुमारास झाला. भरधाव वेगात असलेल्या टेम्पो (क्र. एमएच १६ सिडी ४७४२) व स्विफ्ट कार (क्र. एमएच १२ एसयु ५६५९) यांची जोरदार धडक झाली. या अपघातात एवढा भीषण होता की यात दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं. कार मध्ये असलेले कविता बोरुडे, योगिता बोरुडे आणि कार चालक राजू शिंदे यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

सुदैवाने कार मधील किशोरी बोरुडे ही मुलगी बजावली, टेम्पो मधील धीरज कांतीलाल लोखंडे व श्रीराम बापूराव मांडे हे तिघे जखमी झाले.घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतला. जखमींना पोलीसांनी रुग्णालयात दाखल केलं. या घटने अंतर्गत पुढील तपास सुरु केला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Sep 04, 2023 07:58 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).