Tejas Thackeray आणि टीमकडून सापाच्या नव्या प्रजातीचा शोध
Sahyadriophis असे त्याचे नाव आहे.
New Species of Snake in Western Ghats: तेजस ठाकरे (Tejas Thackeray) आणि त्यांच्या टीमने सापाच्या एका नव्या प्रजातिचा शोध लावला आहे. ज्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली आहे. तेजस हे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे धाकटे सुपुत्र आहेत. कुटुंबााल राजकीय पार्श्वभूमी असूनही ते राजकारणात न रमता रानावनात रमतात. त्यांनी आतापर्यंत विविध जैवविविधतेचा शोध लावला आहे. यात पाली, सरडे, साप आणि माशांचाही समावेश आहे. त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
तेजस ठाकरे आणि हर्षिल पटेल यांच्या नेतृत्वाखालील समूहाने पश्चिम घाटात शोधमोहीम राबवली. ज्यात त्यांना एका नव्या प्रजातीचा शोध लागला. त्यांनी नव्या प्रजातिला सह्याद्रीओफिस उत्तराघाटी (sahyadriophis uttaraghari gen. et. sp. nov.) असे नाव दिले आहे. या शोध मोहिमेत त्यांना कॅम्पबेल, झीशान मिर्झा यांचेही सहकार्य लाभले.
'सह्याद्रीओफिस' असे तेजस यांच्या टीमने शोधलेल्या नव्या सांपाच्या प्रजातिला नाव देण्यात आले आहे. सापासाठी वापरला जाणारा 'ओफिस' हा ग्रीक शब्द आणि आणि पश्चिम घाटासाठी संस्कृतमध्ये वापरला जाणाऱ्या 'सह्याद्री' या शब्दाचे विलीनिकरण करुण 'सह्याद्री ओफिस' असे नामकरण करण्यात आले आहे. हे नामकरण या प्रजातिचे उत्तरेकडे असलेले निवास दर्शवते.
ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्याने प्रस्तावित वंशामध्ये बेडडोमचा कीलबॅक देखील हस्तांतरित करण्यात आला आहे. ज्यामुळे तो आता मध्य आणि दक्षिण घाटापर्यंत मर्यादीत असेल. घाटांतील जैवविविधता समजून घेण्यासाठी हा अभ्यास हातभार लावतो. हे क्षेत्र मानवासाठी अद्यापही गूढ आणि तितकेच रहस्यमय असल्याचे ठाकरे वाईल्डलाईफ फाऊण्डेशने म्हटले आहे.
इन्स्टाग्राम पोस्ट
View this post on Instagram
A post shared by Thackeray Wildlife Foundation (@thackeraywildlifefoundation)
तेजस ठाकरे यांनी अशा प्रकारची प्रजात प्रथमच शोधली नाही. या आधीही त्यांनी अशा अनेक प्रजाती शोधल्या आहेत. ज्यामध्ये खेकडे, मासे, पाली यांसह विविध 11 दुर्मिळ वन्य प्रजातिंचा समावेश आहे. कुटुंबाच्या राजकीय ओळखीच्या पलिकडे जाऊन त्यांनी ही आपली विशेष ओळख जपली आहे. त्यामुळे वेगळ्या अर्थानेही ते चर्चेत असतात.