दिवाळी 2018 : शाळेच्या दिवाळी सुट्ट्या कमी केल्याने शिक्षक, विद्यार्थी नाराज
दिवाळी सुट्ट्यांचा कालावधी 25 नोव्हेंबरपर्यंत 2018 पर्यंत वाढवावा,अशी शिक्षण विभागाकडे शिक्षकांनीची मागणी केली आहे.
दिवाळी आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शाळांना मोठी सुट्टी असते. या दिवसांमध्ये अनेकजण विविध प्लॅन्स करत असतात. मात्र यंदा तुमच्या प्लॅन्सवर पाणी फिरू शकतं. कारण यंदा दिवाळीची सुट्टी कमी करण्यात आलीआहे. यंदा 6 नोव्हेंबरपासून दिवाळी आहे. मात्र दिवाळीच्या सुट्ट्या यंदा 15 दिवसांनी कमी करण्यात आल्या आहेत.
मुंबईमध्ये सामान्यपणे 21 दिवस दिवाळीची सुट्टी असते. यामध्ये यंदा 15 दिवसांची सुट्टी कमी करण्यात आल्याने शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही नाराज आहेत. राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून देण्यात येणार्या सुट्ट्या वाढवण्याची त्यांनी मागणी केली आहे.
शिक्षण विभागाने यंदा बोर्ड स्कूलला 5 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर इतकीच सुट्टी दिली आहे. यापूर्वीपर्यंत शाळांना किमान 20-21 दिवसांची सुट्टी असायची.
दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासण्याचं काम दिलं जातं. कमी कालावधीमध्ये सणाचा आनंद आणि उत्तरपत्रिका तपसण्याचं काम असं दोन्ही सांभाळणं कठीण आहे. त्यामुळे सुट्ट्यांचा कालावधी 25 नोव्हेंबरपर्यंत 2018 पर्यंत वाढवावा,अशी शिक्षण विभागाची मागणी आहे.