Navi Mumbai: 350 लीटर डिझेलची चोरी करणाऱ्या 3 आरोपींना तळोजा पोलिसांकडून अटक; 15 लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त

तळोजा पोलिसांनी डिझेल चोरी करणाऱ्या 3 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 350 लीटर पेट्रोल आणि 3 चार चाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. याची किंमत तब्बल 15,27,650 रुपये इतकी आहे.

Taloja Police arrested 3 accused for diesel stealing (Photo Credits twitter)

तळोजा पोलीस ठाण्याच्या (Taloja Police station) औद्योगिक क्षेत्रात (Industrial area) डिझेल चोरी (Diesel Stealing) करणाऱ्या 3 आरोपींना तळोजा पोलीस ठाणे कडून अटक करण्यात आली.  तांत्रिक तपासाद्वारे आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून चोरीचे 350 लिटर डिझेल आणि चोरीसाठी वापरण्यात येणारी 3 चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. हा  एकूण रु. 15,27,650 किंमतीचा मुद्देमाल आहे. याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai Police) ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

काल (16 ऑगस्ट) लॅपटॉप चोरी करणाऱ्या चोरांना 36 तासात रबाळे एमआयडीसी पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. या चोरांकडून एकूण 6,00,000 रुपये किंमतीचे डेल कंपनीचे 6 लॅपटॉप चार्जरसह पोलिसांनी जप्त केले होते. एका मुलीचा मागोवा घेत पुणे येथून आलेल्या 8 जणांनी मुलीच्या भावास चाकूने मारहाण केली. त्यानंतर कोपरखैरणे पोलिसांनी भरपावसात पाठलाग करुन 5 आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून गुन्ह्यात वापपरण्यात आलेली ओमनी कार, हॉकी स्टीक, चाकू व सुऱ्या हस्तगत करण्यात आल्या. (नागपूर: रेनकोट समजून रुग्णालयातील पीपीटी किट चोरी करणे तळीरामाला पडले महागात; वैद्यकिय तपासणीत आला कोरोना पॉझिटीव्ह)

ANI Tweet:

कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान चोरीचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनास आले होते. मात्र अनलॉकिंगला सुरुवात होताच पुन्हा चोरीच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. दरम्यान, कोविड-19 संकटाच्या काळात केलेल्या कामगिरीची माहिती देणाऱ्या “SENSITIVE NAVI MUMBAI POLICE DURING COVID-19 PANDEMIC” या पुस्तकाचे आज नवी मुंबई पोलिस आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.