मुंबईतील ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ल्याच्या धमकीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांची पोलिस महासंचालक आणि मुंबई पोलिस आयुक्तांसह सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासंदर्भात चर्चा
मुंबईतील ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ल्याच्या धमकीनंतर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महाराष्ट्र डीजीपी आणि मुंबई पोलिस आयुक्तांशी सविस्तर चर्चा केली आहे.
मुंबईतील (Mumbai) हॉटेल ताज (Hotel Taj) वर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला होण्याची धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांसह (Mumbai Police) सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासंदर्भात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी महाराष्ट्र डीजीपी (Maharashtra DGP) आणि मुंबई पोलिस आयुक्तांशी (Mumbai Commissioner of Police) सविस्तर चर्चा केली आहे. तब्बल 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा मुंबईला दहशतवादी हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. मुंबईतील हॉटेल ताज बॉम्बने उडवून देण्याची धमकी फोनवरुन देण्यात आली होती. हा फोन पाकिस्तानातील (Pakistan) कराची (Karachi) येथून आल्याची माहिती समोर येत आहे.
यापूर्वी 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात 166 नागरिकांचा बळी गेला होता. तर सर्व दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात मुंबई पोलिसांना यश आले होते. दरम्यान अजमल कसाब या दहशतावद्याला जिवंत पकड्यात आले होते. (हॉटेल ताज बॉम्बने उडवून देण्याची धमकी, मुंबई शहरावर दहशतवादी हल्ल्याचे पुन्हा एकदा सावट; मुंबई पोलीस सतर्क, बंदोबस्तात वाढ)
ANI Tweet:
26/11 च्या हल्लानंतर आता कोणताही धोका न पत्करता ताज हॉटेल आणि मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान गृहमंत्र्यांनी सुरक्षा व्यवस्था वाढण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा केल्याचे सांगून नागरिकांना आश्वस्त केले आहे.